जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारुन किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना, मुश्रीफांविरुद्धचा वाद पेटणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातला वाद आता चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या कोल्हापुरात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कारण देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कोल्हापुरात प्रवेश नाकारला होता. परंतू हा आदेश झुगारुन किरीट सोमय्या कोल्हापूरसाठी रवाना झाले आहेत.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या कोल्हापूरला रवाना होण्याआधी त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थाना बाहेर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आपल्याला नजरकैदेत ठेवून कोल्हापूरला जाण्यापासून रोखत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला. मुलुंड येथील किरीट सोमय्यांच्या निवासस्थानाबाहेर सोमय्या आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वादही झाला.

किरीट सोमय्यांवर झालेल्या या कारवाईचा भाजप नेत्यांनीही निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हसन मुश्रीफवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे माध्यमांना दाखवत हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं. ‘हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. इतकंच नाही, तर बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्याद्वारे मनी लाँड्रिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं, याचे माझ्याकडे २७०० पानी पुरावे आहेत. हे पुरावे आयकर विभागाला दिले आहेत. सीआरएम सिस्टम प्रा. लि. प्रविण अग्रवाल म्हणून हिचा ऑपरेटर आहे. या कंपनीमधून हसन मुश्रीफांच्या मुलाने दोन कोटींचं कर्ज घेतल्याचं दाखवण्यात आलं आहे.

‘माझ्याकडे १२७ कोटी रुपयांचे पुरावे आहेत. यात हसन मुश्रीफ यांनी विधानसभा निवडणुकीत जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यात त्यांची पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या खात्यात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख ७८ हजार ३४० रुपयांचे समभाग दाखवले आहेत. २०१८-१९मध्ये आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यातून अनेक माहिती समोर आली. ती माहिती दाबण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात १२७ कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार झाल्याचं पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. मुश्रीफ कुटुंबाने सरसेनापती संताजी धनाजी कारखान्यात १०० कोटीहून अधिक भ्रष्टाचार केला आहे, असंही सोमय्या म्हणाले.

ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांनी केलेले हा आरोप हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावले होते. या आरोपसत्रानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी सोमय्यांविरुद्ध निदर्शनंही केली. त्यामुळे सोमवारी कोल्हापुरात किरीट सोमय्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा सामना रंगण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT