कोल्हापूर: उपजिल्हाधिकारी-सरपंचाला लाखो रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ‘यासाठी’ केली होती पैशाची मागणी
दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर दहावा वेतन आयोग लागू करा. गल्लेलठ्ठ पगार मिळत असतानाही, लाच घेण्याची वृत्ती काही शासकीय अधिकार्यांनी कमी होत नाही. चक्क रविवारच्या (9 जानवेरी) सुट्टीच्या दिवशी कार्यालयात आलेल्या प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी आणि राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं. एका स्टोन क्रशर व्यावसायिकावर कारवाई न […]
ADVERTISEMENT

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर दहावा वेतन आयोग लागू करा. गल्लेलठ्ठ पगार मिळत असतानाही, लाच घेण्याची वृत्ती काही शासकीय अधिकार्यांनी कमी होत नाही. चक्क रविवारच्या (9 जानवेरी) सुट्टीच्या दिवशी कार्यालयात आलेल्या प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी आणि राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं.
एका स्टोन क्रशर व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी फराळे गावचा सरपंच संदीप डवर याच्यामार्फत तब्बल 11 लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी साडेपाच लाख रूपये सरपंच डवर याने घेतले आणि दोघेही लाचखोर एसीबीच्या जाळयात अडकले.
या घटनेमुळं जिल्हयाच्या महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. लाचखोर प्रांताधिकार्याच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात 9 लाखापेक्षा अधिक रोकड सापडली आहे.
राधानगरी तालुक्यातील फराळे गावात तक्रारदाराचा स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. स्टोन क्रशरची वाहतूक करणार्या अवजड वाहनामुळं, गावातील रस्ते खराब झाले आहेत. तसंच काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळं ग्रामपंचायतीच्यावतीनं सरपंच संदीप डवर यांनी त्या व्यावसायिकाला क्रशर व्यवसाय बंद का करू नये? अशी नोटीस बजावली होती. तर प्रांताधिकारी प्रधान यांनीही कारवाईची भीती दाखवली होती.