कोल्हापूर: डॉक्टर तरूणीचा मृतदेह आढळला फूटपाथवर, हत्या की आत्महत्या याचा तपास सुरू
कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण चंद्र हेंद्रे यांची कन्या डॉक्टर अपूर्वा हेंद्रे यांचा मृत्यू झाला आहे. या तरूण महिला डॉक्टरचा मृतदेह कोल्हापूरमधल्या ताराबाई पार्क डी मार्ट इथल्या रिक्षा स्टॉप च्या फुटपाथवर मृतदेह आढळून आला. कोल्हापूर : जीवलग मित्राने केला घात, सराफ मित्राच्या दुकानातून चोरलं 56 तोळे सोनं शनिवारी […]
ADVERTISEMENT
कोल्हापूर जिल्हा मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण चंद्र हेंद्रे यांची कन्या डॉक्टर अपूर्वा हेंद्रे यांचा मृत्यू झाला आहे. या तरूण महिला डॉक्टरचा मृतदेह कोल्हापूरमधल्या ताराबाई पार्क डी मार्ट इथल्या रिक्षा स्टॉप च्या फुटपाथवर मृतदेह आढळून आला.
ADVERTISEMENT
कोल्हापूर : जीवलग मित्राने केला घात, सराफ मित्राच्या दुकानातून चोरलं 56 तोळे सोनं
शनिवारी संध्याकाळी अपूर्वा केंद्रे या एका कार्यक्रमाला गेल्या होत्या त्यानंतर त्या रात्री घरी आल्या. अचानक परत घरातून कुणाला न सांगता बाहेर पडल्या. घरच्यांनी तिचा शोध घेतला, मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे ताराबाई पार्क तील एका फुटपाथवर एका महिलेचा मृतदेह दिसून आला. नातेवाईकांनी अपूर्वा हेंद्रे हिला तात्काळ सरकारी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं मात्र त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता हातात इंजेक्शन अडकलेलं होतं. तिच्या जवळील पर्समध्ये इंजेक्शन आणि औषधाची बाटली आढळून आली याबाबत शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे वाचलं का?
पोलिसांच्या मदतीने कुटुंबीयांचा पहाटेपर्यंत शोध सुरू असतानाच घराजवळील डी मार्ट जवळील रिक्षा स्टॉपला लागून असलेल्या फुटपाथवर डॉ. अपूर्वा बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्याच ठिकाणी पोलिसांना इंजेक्शनची वापरलेली कुपी तसेच सिरींज आढळून आली. वडिलांनी तत्काळ त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले, पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.
कोल्हापूर: आयुर्वेद पंचकर्म मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, महिलेला अटक
ADVERTISEMENT
डॉक्टर अपूर्वा यांचा मृतदेह आढळल्यानंतर आता त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याचा शोध आता कोल्हापूर पोलीस घेत आहेत. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT