LAC: गलवानमध्ये भारतीय लष्कराची अचानक वाढली हालचाल, नेमकं काय घडणार?
लडाख: राजधानी दिल्लीत सध्या जी -20 परिषद सुरू आहे. अलीकडेच चीनी परराष्ट्रमंत्री आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेटही झाली. यापूर्वी जयशंकर यांनी चीनशी संबंध ‘असामान्य’ असल्याचे वर्णन केले आहे. दरम्यान, भारतीय सैन्याने लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. त्यामुळे बॉर्डरवर नेमकं काय घडणार? याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (lac sudden […]
ADVERTISEMENT
लडाख: राजधानी दिल्लीत सध्या जी -20 परिषद सुरू आहे. अलीकडेच चीनी परराष्ट्रमंत्री आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेटही झाली. यापूर्वी जयशंकर यांनी चीनशी संबंध ‘असामान्य’ असल्याचे वर्णन केले आहे. दरम्यान, भारतीय सैन्याने लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. त्यामुळे बॉर्डरवर नेमकं काय घडणार? याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (lac sudden stir in ladakh galwan and pangong indian army in action)
ADVERTISEMENT
लडाख येथील गलवान खोऱ्यात LAC वर तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या तुकड्यांचे हालचाली वाढविण्यात आल्या असून सैन्यातील जवानांनी घोडे आणि खेचरे यांच्या साहाय्याने आसपासच्या भागांचे सर्वेक्षण केले आहे. या व्यतिरिक्त, पँगोंग लेकवर हाफ मॅरेथॉन सारख्या गोष्टीही सुरू आहेत.
#WATCH | Indian Army formations deployed near the Galwan valley have undertaken extreme activities such as surveying the areas near the Line of Actual Control on horses and ponies and half marathon over the frozen Pangong lake in recent months pic.twitter.com/81rwqPdUnH
— ANI (@ANI) March 4, 2023
हे वाचलं का?
यापूर्वी भारतीय सैन्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये भारतीय सैन्यातील काही जवान हे पूर्व लडाखमध्ये क्रिकेट खेळताना दिसत होते. ईस्टर्न लडाख मे 2020 पासून चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाचं केंद्र आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये लष्करी तणाव देखील वाढला आहे.
डिवचलंत तर आम्ही कोणालाही सोडणार नाही ! चीनसोबत सीमावादावरुन राजनाथ सिंहांचा इशारा
ADVERTISEMENT
तथापि, सैनिक क्रिकेट खेळत असलेल्या भागाचा खुलासा भारताच्या सैन्याने केला नाही. परंतु इंडिया टुडे जिओमे हे ठिकाण मॅपच्या माध्यमातून शोधले आहे. भारतीय सैन्य सैनिक ज्या ठिकाणी क्रिकेट खेळत आहेत ते ठिकाण पेट्रोल पॉईंट 14 पासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर आहे. पेट्रोल पॉईंट 14 त्याच ठिकाणी आहे जेथे जून 2020 मध्ये चिनी सैन्याने विश्वासघात करून भारताच्या सैनिकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात देशातील 20 जवान शहीद झाले होते. त्याच वेळी, चीनने बर्याच दिवसांनंतर कबूल केलेले की त्याच्या 5 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
लेह येथे कार्यरत असलेल्या भारतीय सैन्याच्या 14 कॉर्प्सने ट्विट केलं की, “पटियाला ब्रिगेड, त्रिशुल विभागाने शून्यापेक्षा कमी तापमानात अत्यधिक उंचीच्या क्षेत्रात पूर्ण उत्साहाने क्रिकेट सामना आयोजित केला. आम्ही अशक्य ते शक्य करतो.”
#Patiala Brigade #Trishul Division organised a cricket competition in extreme high altitude area in Sub zero temperatures with full enthusiasm and zeal. We make the Impossible Possible@adgpi @NorthernComd_IA pic.twitter.com/0RWPPxGaJq
— @firefurycorps_IA (@firefurycorps) March 3, 2023
गलवान खोऱ्यात आमचे पाच सैनिक ठार, चीनने वर्षभराने दिली कबुली
भारतीय सैन्य ज्या ठिकाणी क्रिकेट खेळत आहे ते ठिकाण समोरासमोर संघर्ष टाळण्यासाठी भारत आणि चीनने बनवलेल्या बफर झोनपासून बऱ्यापैकी दूर आहे. दोन देशांच्या सैन्याकडून संघर्ष टाळण्यासाठी, त्याने त्याच्या स्थानापासून 1.5 किमी अंतरावर माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि हे ठिकाण बफर झोनमध्ये बदलले आहे. डायन आर्मीने 700 मीटर मागे हटून लष्कराचं पहिला कॅम्प बांधला आहे. यानंतर कॅम्प क्रमांक -2 आणि भारताच्या सैन्याच्या कॅम्प क्रमांक 3 आहे. हे कॅम्प जवळजवळ समान अंतरावर आहेत, जेणेकरून चीनी लष्कराच्या हालचालींचे परीक्षण केले जाऊ शकते.
Galwan Valley: गलवान चकमकीत तब्बल 38 चीनी सैनिक नदीत गेलेले वाहून, ऑस्ट्रेलियन मीडियाकडून चीनची पोलखोल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT