लखीमपूर खीरी हिंसाचार : नियोजित हल्ला करून शेतकऱ्यांची हत्या; राहुल गांधींचा गंभीर आरोप
लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. नियोजित हल्ला करून शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी आज लखीमपूर खीरीला भेट देणार आहेत. लखीमपूर खीरी परिसरात झालेल्या क्रूर […]
ADVERTISEMENT

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. नियोजित हल्ला करून शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी आज लखीमपूर खीरीला भेट देणार आहेत.
लखीमपूर खीरी परिसरात झालेल्या क्रूर घटनेनंतर राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ आज पीडितांच्या कुटुंबियांची घेणार होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने 144 कलम लागू असल्याचं सांगत भेटीची परवानगी नाकारली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपण दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूरीला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. कलम 144 नुसार 5 लोक जाऊ शकत नाही, पण तीन लोकांना रोखता येत नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लखीमपूर खीरी : व्हिडीओच समोर आलाय, आता तरी दोन अश्रू ढाळा -शिवसेना
‘शेतकऱ्यांवर सरकारकडून आक्रमण केलं जात आहे. जीपखाली चिरडून शेतकऱ्यांच्या हत्या केल्या जात आहे. भाजपच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्याच्या मुलाबद्दल बोललं जात आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आज पद्धतशीरपणे शेतकऱ्यांकडून त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहे. काल पंतप्रधान लखनऊमध्ये होते, पण ते लखीमपूर खीरीत गेले नाहीत’, अशी टीका राहुल गांधींनी केली.