पुणे लाल महाल लावणी प्रकरण : वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा!
पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. लाल महालात चंद्रा या गाण्यावर वैष्णवी पाटील या महिला नृत्य कलाकाराने लावणी केली होती. त्यावरूनच हा वाद निर्माण झाला. आता वैष्णवी पाटीलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या प्रकरणी जाहीर […]
ADVERTISEMENT

पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. लाल महालात चंद्रा या गाण्यावर वैष्णवी पाटील या महिला नृत्य कलाकाराने लावणी केली होती. त्यावरूनच हा वाद निर्माण झाला. आता वैष्णवी पाटीलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे.
काय म्हणाली आहे वैष्णवी पाटील?
“सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माझा नमस्कार. मी आज हे सांगू इच्छिते काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रेष्ठ असा जिजाऊ महाराजांच्या लाल महालात चंद्रा या गाण्यावर नाच करत आमचा एक व्हीडिओ केला होता. तो व्हीडिओ करत असताना माझ्या मनीध्यानीही काहीच आलं नव्हतं की यातून काही वाद निर्माण होईल. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातील, जनतेचं मन दुखावलं जाईल, भावना दुखावल्या जातील हे मनातही आलं नव्हतं. मात्र ही चूक माझ्याकडून झाली हे मला कळलं. त्याक्षणी मी तो व्हीडिओ डिलिट केला. पण तो खूप व्हायरल झाला होता. मी सर्वांना आज सांगते आहे की तो व्हीडिओ डिलिट करा. “
“जे मी केलं ती माझी चूक होती. मी सगळ्या जनतेची, शिवप्रेमींची सगळ्यांची हात जोडून माफी मागते. जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असा माझा काहीही हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून ही चूक झाली त्याबद्दल मी माफी मागते. मी सगळ्यांना वचन देते आहे की यापुढे माझ्याकडून कधीही अशी चूक होणार नाही.”










