‘आमच्या लग्नाला संमती मिळेल?’ लेस्बियन जोडप्याचा इमोशनल Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Supreme Court decision on LGBTQ Marriage : सध्या समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. देशात पुन्हा एकदा समलैगिंक विवाहावरून (LGBTQ Marriage) वादविवाद सुरू आहेत. सीजेआयच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवले आहे. न्यायालयाचे म्हणणं आहे की, हा मुद्दा महत्त्वाचा असल्या कारणाने सुनावणीसाठी आणि निकाल देण्यासाठी ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे पाठवली जाते. असं असताना दुसरीकडे यश्विका आणि पायल नावाच्या एका लेस्बियन कपलने त्यांच्या युट्यूब चॅनलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. (lesbian couple Payal and Yashvika Viral Video of there marriage on LGBTQ supreme court decision)

ADVERTISEMENT

Sheetal Mhatre: प्रकाश सुर्वेंच्या मुलाला पोलीस अटक करू शकतात -सरदेसाई

यश्विका आणि पायल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असून, आजपर्यंत त्यांच्या विवाहाला कायदेशीररित्या मान्यता मिळालेली नाहीये. एकीकडे देशात पुन्हा एकदा समलैंगिक विवाहाची चर्चा जोर धरू लागल्यामुळे पायल आणि यश्विकाने हा मुद्दा उपस्थित केला आहे. व्हिडीओ शेअर करत यश्विका म्हणाली,’या याचिकेवर वादविवाद सुरू असताना आम्ही आशा करतो की, एक दिवस असा येईल ज्यावेळी आमच्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळेल.’

हे वाचलं का?

सर्वोच्च न्यायालय लवकरच, यावर सुनावणी करणार आहे. यश्विका पुढे म्हणाली, ‘LGBTQ समुदायापेक्षा सर्वसामान्य लोक आम्हाला जास्त सपोर्ट करतात. पण काहीजण LGBTQ समुदायातील लोकांना सामान्य मानत नाही. आम्ही इतरांप्रमाणे आमच्या रिलेशनच्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो जेणेकरून, सर्वांना हे सामान्य वाटेल.’

Anil Parab यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; ईडीला महत्वाचे निर्देश

ADVERTISEMENT

LGBTQ समुदायाबाबत कोणती मोठी गोष्ट यश्विकाने उघड केली?

ADVERTISEMENT

LGBTQ समुदायाबाबत यश्विकाने सांगितलं की, ‘LGBTQ समुदायातील लोक स्वतःच्या लोकांना स्वीकारू शकत नाहीत तर, इतरांकडून कसली अपेक्षा करायची.’ व्हिडीओमध्ये पायलने हा प्रश्न उपस्थित केला की, ‘आमचं लग्न कायदेशीर मान्य होईल की नाही?’ पायल म्हणाली, ‘स्वातंत्र्याच्या नावाखाली या लढाईत मला हे मान्य नाही की, रस्त्यावर उतरून काहीही करावं, आम्ही LGBTQ समुदायातील आहोत हे जोरजोरात ओरडून सांगावं. हे मला पटत नाही. या गोष्टीला सामान्य वागणूक द्या. जर, या विवाहाला मान्यता मिळाली नाही तर गरज पडल्यास आम्ही मान्यता मिळवण्यासाठी याचिका दाखल करू.’ पायल आणि यश्विकाने त्यांची आणि LGBTQ समुदायातील सर्वांची व्यथा या व्हिडीओतून मांडली.

केंद्र सरकारचा समलैंगिक विवाहाला विरोध!

केंद्र सरकारने समलैंगिक विवाहाला विरोध केला आहे. याबाबत सरकारने दिलेल्या माहितीनुसार लग्नाची संकल्पना अशी आहे की दोन विरुद्ध लिंगी लोकांमध्येच लग्न होते. तसंच, न्यायालयात ट्रान्सजेंडरची बाजू मांडणाऱ्या वकिलाने असा युक्तिवाद केला आहे की, केंद्राचे प्रतिज्ञापत्र ट्रान्सजेंडरच्या अधिकारांचे संरक्षण करत नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT