अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं मुख्यमंत्र्यांना पत्र; शूटींग सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी
राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येतायत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला. यामध्ये मालिका तसंच फिल्मच्या शूटींगवर परिणाम झालाय. यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्र्यांने काही मागण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे […]
ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येतायत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला. यामध्ये मालिका तसंच फिल्मच्या शूटींगवर परिणाम झालाय. यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय.
या पत्राद्वारे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्र्यांने काही मागण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे नियम आणि अटींसह शूटींगला परवानगी द्यावी ही मुख्य मागणी करण्यात आलीये.
शूटींग करायचे असेल तर हे नियम पाळावेच लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्मात्यांच्या बैठकीत दिले सक्त आदेश
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला. त्याअंतर्गत आपण सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला ब्रेक दिलात. खरं तर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता घरातच खिळवून ठेवण्याचे काम आपली मनोरंजन इंडस्ट्री करीत असते.