LockDown New Rules : कठोर निर्बंधांविषयी तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
महाराष्ट्रात आजपासून आणखी कठोर निर्बंध लागू झाले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नसल्याने बुधवारी रात्रीच यासंदर्भातलं पत्रक काढण्यात आलं होतं. निर्बंध आणखी कठोर करण्यात आल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. जसं की जिल्हाबंदीचा निर्णय असेल किंवा लग्नाला 25 पेक्षा जास्त माणसं जमली असतील तर आणि दोन तासांमध्ये लग्न उरकलं नाही तर 50 हजारांचा दंड […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आजपासून आणखी कठोर निर्बंध लागू झाले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नसल्याने बुधवारी रात्रीच यासंदर्भातलं पत्रक काढण्यात आलं होतं. निर्बंध आणखी कठोर करण्यात आल्याचं त्यात नमूद करण्यात आलं होतं. जसं की जिल्हाबंदीचा निर्णय असेल किंवा लग्नाला 25 पेक्षा जास्त माणसं जमली असतील तर आणि दोन तासांमध्ये लग्न उरकलं नाही तर 50 हजारांचा दंड होईल असे अनेक निर्बंध लागू करण्यात आले. तरीही निर्बंध कठोर झाले म्हणजे नेमकं काय झालं? प्रवास करता येईल की नाही? प्रवास कुणाला करता येईल? बाहेर पडलं तर काय होईल? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता सरकारने दिली आहेत.
ADVERTISEMENT
डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे लोक हे जिल्हा अंतर्गत प्रवास करू शकतात की त्यावर काही निर्बंध असतील?
हे वाचलं का?
उत्तर- होय डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवा पुरवणारे लोक यांना जिल्हाबंदी नाही. ते एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात खासगी, सार्वजनिक किंवा स्वतःच्या वाहनाने प्रवास रू शकतात. त्यांच्याजवळ त्यांचं ओळखपत्र असणं आवश्यक आहे. तसंच या सगळ्यांनी प्रवास करण्याचं आरोग्यविषयक कारण त्यांच्याकडे असलं पाहिजे.
कोणत्या लोकांना लोकल ट्रेन्सचा प्रवास करण्यास संमती आहे?
ADVERTISEMENT
उत्तर- सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी हे लोकल ट्रेनने प्रवास करू शकतात. अत्यावश्यक सेवेतले कर्मचारीही प्रवास करू शकतात. त्यांच्याकडे त्यांचं ओळखपत्र असणं आवश्यक आहे. MCGM, TMC आणि इतर स्थानिक संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी, जिल्हा परिषद किंवा सरकारी संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी लोकल प्रवास करू शकतात.
ADVERTISEMENT
माल निर्यातीसाठी काम करणाऱ्या विभागांसाठी काय नियम आहे?
उत्तर- निर्यातीसंदर्भात काम करणाऱ्या विभागांना निर्याती संदर्भात सूट देण्यात आली आहे. माल वाहतूक करण्यासही संमती देण्यात आली आहे. या संदर्भात 13 एप्रिलला जी सूट देण्यात आली आहे तीच सूट आत्ताही कायम आहे
सगळया बँकांमध्ये 15 टक्केच उपस्थिती अपेक्षित आहे का?
उत्तर: होय बँकांमध्ये 15 टक्केच उपस्थिती अपेक्षित आहे. सेक्शन 5 अंतर्गत हा नियम लागू करण्यात आला आहे. सगळ्या बँकांमध्ये 15 टक्के उपस्थिती किंवा पाच लोकांची उपस्थिती यापैकी जे जास्त असेल तसे लागू करावे.
ऑटो रिक्षा आणि टॅक्सी सेवा कोण वापरू शकतं?
उत्तर- अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी, सरकारी कर्मचारी हे रिक्षा आणि टॅक्सी वापरू शकता. कोणतीही मेडिकल इमर्जन्सी असेल तरीही रिक्षा टॅक्सी वापरता येईल. कोणत्याही योग्य कारणासाठी 13 एप्रिलच्या ऑर्डरनुसार जसे की परीक्षा द्यायची असल्यास, एअरपोर्टवर जायचे असल्यास, लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करायचा असल्यास, बसच्या स्टँडवर जायचं असेल तर रिक्षा आणि टॅक्सी वापरता येईल.
आंतर जिल्हा प्रवासाला संमती आहे का?
उत्तर – आंतर जिल्हा प्रवासाला खासगी वाहनाने किंवा प्रायव्हेट कारने प्रवास केल्यास संमती आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेन्स किंवा बसनेही प्रवास करता येईल मात्र त्यासाठीचे कारण हे अत्यावश्यक असलं पाहिजे. मेडिकल इमर्जन्सी असल्यास, कुटुंबात कुणाचा मृत्यू झाला असल्यास प्रवास करता येईल. मात्र होम क्वारंटाईन राहणं आवश्यक असेल आणि इतर कोरोना प्रतिबंधाचे नियमही पाळावे लागणार
सरकारी कार्यालयांमध्ये भेटायला येणाऱ्यांना संमती आहे का?
उत्तर- सरकारी कार्यालयांमध्ये भेटायला येणाऱ्यांना संमती नाही. रजिस्ट्रेशनचं कारण असेल तर रजिस्ट्रार ऑफिसमध्ये लोक जाऊ शकतात मात्र त्यासाठी आधी अपॉईंटमेंट घेणं आवश्यक आहे. या ऑफिसेसमध्येही 15 टक्के लोकांचीच उपस्थिती अपेक्षित आहे.
शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं यांच्याबाबत काय नियम आहे?
शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं बंद राहतील. यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनाही 15 टक्केच उपस्थितीची मर्यादा आहे.
RTPCR आणि RAT ही चाचणी कुणासाठी बंधनकारक आहे?
RTPCR आणि RAT या दोन्ही चाचण्या जे परीक्षांमध्ये सहभागी आहेत उदाहरणार्थ परीक्षक, मार्गदर्शक यांना ही चाचणी करावीच लागेल. लग्न समारंभाचा जो हॉल आहे तिथले स्वयंपाकी, वाढपी यांनाही चाचणी करावी लागेल. होम डिलिव्हरी करणाऱ्यांना ही चाचणी करणं बंधनकारक नाही.
Lockdown: दोन तासात लग्न आटपा नाहीतर 50 हजारांचा दंड, 22 तारखेपासून नवे निर्बंध
सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम आहे का?
उत्तर – होय जे प्रत्यक्षात कामावर हजर होणार नाहीत अशा 85 टक्के कर्मचाऱ्यांनी घरून काम करणं अपेक्षित आहे. तसंच त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंग्जही घ्याव्यात (गरज असल्यास)
जर कुणी एखाद्या शहरात किंवा दुसऱ्या राज्यात अडकून पडलं असेल तर ते आपल्या कारने त्यांच्या मूळ शहरात, गावात परतू शकतात का?
महाराष्ट्राचा रहिवासी दुसऱ्या राज्यात अडकून पडला असेल तर तो विमान किंवा लांब पल्ल्याच्या ट्रेनने महाराष्ट्रात येऊ शकतो. बस आणि टॅक्सी रिक्षाने प्रवास आपल्या घरी पोहचू शकतो. मात्र कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं बंधनकारक
व्यवसायासाठी आंतरजिल्हा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे का?
नाही, व्यवसाय करण्यासाठी आंतरजिल्हा प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT