अनैतिक संबंध… प्रेयसीची हत्या आणि मास्टरमाईंड प्रियकर, पुण्यातील नेमकं प्रकरण आहे तरी काय?

मुंबई तक

पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातील जेजुरी (Jejuri) येथे एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीची देखील हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Pune Girlfriend Murder) मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसी ही प्रियकरासह त्याच्या घरातील लोकांना देखील सातत्याने त्रास देत होती. त्यामुळे प्रेयसीपासून पिच्छा सोडविण्यासाठी प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातील जेजुरी (Jejuri) येथे एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीची देखील हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Pune Girlfriend Murder) मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसी ही प्रियकरासह त्याच्या घरातील लोकांना देखील सातत्याने त्रास देत होती. त्यामुळे प्रेयसीपासून पिच्छा सोडविण्यासाठी प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीचा अपघात (Accident) घडवून आणला.

या अपघातात दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना जेजुरी पोलीस स्टेशन परिसरात घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चालकासह तीन जणांना अटक केली आहे.

1 एप्रिलला बारामती जवळील नीरा गावात एक अपघात झाला होता. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन महिलांना नंबर प्लेट नसलेल्या एका स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या होता. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दोघींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या अपघातप्रकरणी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली.

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री

हे वाचलं का?

    follow whatsapp