Maharashtra Arogya Vibhag Admit Card 2021 : आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी & ग्रुप डी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा 25 व 26 सप्टेंबर रोजी होणार आहेत. या परीक्षेसाठी साधारणपणे गट ‘क’साठी एकूण 2740 एवढय़ा जागा भरण्यात येणार आहेत. गट ‘ड’साठी 3 हजार 500 जागा भरण्यात येणार आहेत. एकूण जवळपास 6 हजार 200 जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अर्जदेखील आले आहेत आणि हॉल तिकीटपण दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ADVERTISEMENT

आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार होती. त्याऐवजी आता 25 सप्टेंबर गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Arogya Vibhag Bharati 2021 Where To Download Admit Card: आरोग्य भरतीच्या अधिकृत वेबसाइट वरून 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशप्रत्र आरोग्य विभागाने प्रकाशित केले आहे.

हे वाचलं का?

आरोग्य विभागाकडून काही जणांना ई-मेल येत आहेत त्यावरूनही तुम्ही तुम्हचे Admit Card डाऊनलोड करू शकता. पण ज्यांना ई-मेल आला नाही त्यांनी घाबरून जाऊ नये. खालील स्टेप नुसार Admit Card डाऊनलोड करू शकता.

आरोग्य विभाग भरती 2021 चे Admit Card कसे डाउनलोड करावे ?

ADVERTISEMENT

सर्वात आधी आरोग्य भरती 2021 च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर Click करा.

ADVERTISEMENT

त्या नंतर फॉर्म भरतांना तुम्हाला Login Id व Password मिळाला आहे तो व Captcha टाका

नंतर ‘Login’ वर Click करा.

आता नवे पेज उघडेल तेथे डाव्या बाजूला Admit Card असा Option दिसेल त्यावर क्लीक करा आणि Admit Card डाऊनलोड करून घ्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT