Mansukh Hiran हत्येप्रकरणी ATS कडून दोन आरोपींना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) दोन आरोपींना आज (21 मार्च) अटक केली आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना काल (20 मार्च) चौकशीला बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर या दोनही आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. अखेर आज त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर दोनही आरोपींची चौकशी सुरु होती. मात्र याविषयी अधिक माहिती हवी असल्याने एटीएसने रात्रभर चौकशी सुरुच ठेवली होती. दरम्यान, आज सकाळी ९ च्या सुमारास या दोघांनाही अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती ATS कडून देण्यात आली आहे.

दोन आरोपींच्या अटकेनंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे दोन आरोपी नेमके कोण आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

हे वाचलं का?

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास ATS कडून NIA

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी ATS ने दोन जणांना अटक केलेली असली तरीही आता याप्रकरणाचा तपास NIA करणार आहे. यापूर्वी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता. मात्र याप्रकरणी एटीएसला फार गती मिळाली नसल्याने आता हा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला असल्याचं समजतं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरण NIAकडे हस्तांतरित करण्याबाबतची अधिसूचना देखील जारी झाली आहे. एनआयएच्या प्रवक्त्याने या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्याच्या वृत्ताला कालच (20 मार्च) दुजोरा देण्यात आला होता.

ADVERTISEMENT

सुरुवातीला संशयित स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने त्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने चौकशीअंती पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली होती. दुसरीकडे याचसंबंधी मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हा महाराष्ट्र एटीएस करत होता. पण आता या प्रकरणी एनआयए तपास करणार आहे.

मोठी बातमी: मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही NIA कडे, ATS ला धक्का

NIA कडे कोणत्या आधारे सोपविण्यात आला मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास?

अँटेलिया स्फोटकं प्रकरणात सुरुवातीला एनआयए तपास करत होती. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए करु शकतं की नाही? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता. पण अशाप्रकारचा तपास एनआयए करु शकतं.

कारण NIA कायद्याच्या कलम 8 अंतर्गत परस्पर निगडीत प्रकरणाची चौकशी एनआयए करु शकतं. याच कलमानुसार आता एनआयए अँटेलिया कार प्रकरणासोबत मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास देखील करणार आहे.

दरम्यान, अँटेलिया प्रकरणात सर्वात धक्कादायक संशय हा मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला होता. ‘सचिन वाझे यांनीच माझे पती मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय मला आहे.’ असा संशय मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी त्यांच्या कबुली जबाबात व्यक्त केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT