विद्यार्थ्यांनो जोमाने करा तयारी! दहावी-बारावीच्या परीक्षांचं टाइमटेबल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्चपासून सुरू होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती दिली आहे. बारावीची परीक्षा 4 मार्च 2022 पासून आणि दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. mahahsc.in […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्चपासून सुरू होणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून वेळापत्रक जाहीर झाल्याची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
बारावीची परीक्षा 4 मार्च 2022 पासून आणि दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. mahahsc.in या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी परीक्षेचं वेळापत्रक तपासू शकतात.
ठरलं! महाराष्ट्रात या तारखांना होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा!
हे वाचलं का?
The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education has issued subjectwise timetable for the 2021-22 board exams of Std.10th (SSC) & Std. 12th (HSC).The same can be accessed athttps://t.co/KX9sqYrmnj.Wishing all students the best of luck!! @msbshse @MahaDGIPR
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 21, 2021
14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. तर 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.
दहावीचं वेळापत्रक कसं आहे?
ADVERTISEMENT
15 मार्च 2022- 10.30 ते 2
ADVERTISEMENT
– प्रथम भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगु, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी
दुपारी 3 ते 6- द्वितीय भाषा जर्मन, फ्रेंच
16 मार्च- 10.30 ते 12.45
द्वितीय भाषा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगु, मल्याळम, सिंधी, बंगाल, पंजाबी
10.30 ते 12.45 द्वितीय किंवा तृतीय भाषा मराठी संयुक्त
17 मार्च 2022- 10.30 ते 2 – मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख,ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन, स्टोअर ऑपरेशन असिस्टंट, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट, टुरिझम अँड हॉस्पिटलिटी फुड अँड बेवरेज सर्व्हिस ट्रेनी, अॅग्रिकल्चर सोलनेशियस क्रॉप कल्टिवेटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर फील्ड टेक्निशिअन जर होम अप्लायनसेस, होमक केअर, होम हेल्थ एड, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॉवर कंझ्युमर एनर्जी मीटर टेक्निशिअन, अॅपरेल्स सुईंग मशीन ऑपरेटर, प्लंबर जरनरल
19 मार्च 2022 -10.30 ते 2.00
प्रथम भाषा इंग्रजी (03), तृतीय भाषा इंग्रजी (17)
21 मार्च- 10.30 ते 2.00-द्वितीय आणि तृतीय भाषा हिंदी
10.30 ते 12.45-द्वितीय भाषा संयुक्त अभ्यासक्रम
22 मार्च 2022-10.30 ते 2.00-
द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा
उर्दू, गुजराती, संस्कृत, पाली, अर्धमागधी, पर्शियन, अरेबिक, अवेस्ता, पहलबी, रशियन
दुपारी 3 ते 5.15-
द्वितीय भाषा संयुक्त अभ्यासक्रम
उर्दू (संयुक्त), गुजराती (संयुक्त), संस्कृत(संयुक्त), पाली(संयुक्त), अर्धमागधी(संयुक्त), पर्शियन(संयुक्त), अरेबिक(संयुक्त), अवेस्ता(संयुक्त), पहलबी(संयुक्त), रशियन(संयुक्त), गुजराती (संयुक्त), कन्नड (संयुक्त), तामिळ (संयुक्त), तेलुगु (संयुक्त), मल्याळम (संयुक्त), सिंधी (संयुक्त), बंगाली (संयुक्त), पंजाबी (संयुक्त)
24 मार्च 2022- 10.30 ते 2
गणित भाग १-बीजगणित
10.30 ते 12.45-अंकगणित (पात्र दिव्यांग परीक्षार्थींसाठी)
बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक कसं आहे?
4 मार्च 2022 – 10.30 ते 2- इंग्रजी
5 मार्च 2022- 10.30 ते 2- हिंदी
दुपारी 3 ते 6.30- जर्मन, जपानी, पर्शियन
07 मार्च 2022- 10.30 ते 2.00
मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी,(अरेबिक, देवनागरी), मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली
3.00 ते 6.30-उर्दू, फ्रेंच, अर्धमागधी, स्पॅनिश, पाली
8 मार्च 2022 -10.30 ते 2.00-
महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत
3 ते 6.30
रशियन, अरेबिक
9 मार्च 2022-10.30 ते 2.00- वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन
10 मार्च 2022- 10.30 ते 2.00- तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र
11 मार्च 2022- 10.30 ते 2.00- चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
12 मार्च -10.30 ते 2.00- रसायनशास्त्र
दुपारी 3 ते 6.30- राज्य शास्त्र (कला आणि वाणिज्य)
14 मार्च- 10.30 ते 2.00- गणित आणि संख्याशास्त्र (कला, वाणिज्य आणि विज्ञान)
3 ते 5.45- तालवाद्य नियमित आणि पुनर्परीक्षार्थी
15 मार्च 2022- 10.30 ते 2.00- बालविकास, कृषि विज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान
बारावीच्या एमसीव्हीसी परीक्षा वेळापत्रकाचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT