मोठी बातमी! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रूग्णालयात दाखल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रूग्णालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे प्रेस नोट काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे. मानेच्या दुखण्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरे हे रूग्णलयात दाखल झाले आहेत. काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे? माझ्या बंधू, भगिनींनो आणि मातांनो जय महाराष्ट्र! गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रूग्णालयात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे प्रेस नोट काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे. मानेच्या दुखण्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरे हे रूग्णलयात दाखल झाले आहेत.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
माझ्या बंधू, भगिनींनो आणि मातांनो
हे वाचलं का?
जय महाराष्ट्र!
गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच !
ADVERTISEMENT
पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.
ADVERTISEMENT
आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो.
आपला नम्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंढरपूर येथील चौपदरी मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीवरून हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या मानेल पट्टा लावण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांना मानदुखीचा त्रास सुरू झाल्याचं दिसत होतं. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसतानाही ते कार्यक्रमाला हजर राहिल्याचा आवर्जून उल्लेख केला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बारामतीच्या कार्यक्रमात उपस्थिती होती. मात्र त्यावेळीही त्यांनी मान दुखत असल्याचं सांगितलं होतं. मानेच्या दुखण्याकडे गेल्या काही दिवसांपासून त्यांना पाहण्यास वेळ मिळाला नव्हता. आता डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रूग्णालयात दाखल होत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT