Maharashtra Covid Update : महाराष्ट्रात १०३ रुग्णांचा मृत्यू; पुण्यात आढळले सर्वाधिक रुग्ण

मुंबई तक

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाट नियंत्रणात येत असली, तरी राज्याच्या काही भागांत मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात राज्यात २४ हजार ९४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. महत्त्वाचं म्हणजे राज्यात मागील काही महिन्यानंतर प्रथमच १०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून कोरोना आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्यातील काही शहरात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाट नियंत्रणात येत असली, तरी राज्याच्या काही भागांत मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात राज्यात २४ हजार ९४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. महत्त्वाचं म्हणजे राज्यात मागील काही महिन्यानंतर प्रथमच १०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून कोरोना आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्यातील काही शहरात अजूनही मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आज २४,९४८ रुग्ण आढळून आले असले, तरी बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ४५,६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात ७२,४२,६४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी असून, १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८६ टक्के इतका असून, रिकव्हरी रेट ९४.६१ टक्के इतका आहे. आजपर्यंत राज्यात ७,४१,६३,८५८ नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी ७६,५५,५५४ म्हणजेच १०.३२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

राज्यात ‘या’ ठिकाणी आढळले एक हजारपेक्षा जास्त रुग्ण

हे वाचलं का?

    follow whatsapp