Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात रुग्णसंख्येची उसळी; २१४ जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह
महाराष्ट्रात बुधवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १८ जानेवारी राज्यात आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज ४ हजार रुग्ण जास्त आढळून आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात आज २१४ ऑमिक्रॉन बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या २ हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात दिवसभरात ४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात बुधवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १८ जानेवारी राज्यात आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज ४ हजार रुग्ण जास्त आढळून आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात आज २१४ ऑमिक्रॉन बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या २ हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यात दिवसभरात ४९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात आज दिवसभरात (१९ जानेवारी) ४३ हजार ६९७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या वाढून २,६४,७०८ वर पोहोचली आहे. दुसरीकडे राज्यात ४६ हाजर ५९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आतापर्यंत १ लाख ४१ हजार ९३४ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात सध्या २३ लाख ९३ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाईन असून, ३ हजार २०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९४.४ टक्के इतका असून, कोविड मृत्यूदर १.९३ टक्के इतका आहे.
ओमिक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ