धक्कादायक! नांदेडमध्ये 11 वर्षांच्या मुलाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार
बलात्काराच्या मन सून्न करणाऱ्या घटनेने नांदेड हादरलं आहे. नांदेडमध्ये 11 वर्षांच्या मुलाने 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकरा वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडिताही अल्पवयीनच आहे. या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. सध्याच्या घडीला कोरोना संकट लक्षात घेऊन […]
ADVERTISEMENT

बलात्काराच्या मन सून्न करणाऱ्या घटनेने नांदेड हादरलं आहे. नांदेडमध्ये 11 वर्षांच्या मुलाने 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकरा वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडिताही अल्पवयीनच आहे. या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.
सध्याच्या घडीला कोरोना संकट लक्षात घेऊन प्रसार वाढू नये म्हणून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हाती मोबाईल दिला आहे. मात्र मोबाईलवर मुलं काय बघत असतात? नक्की अभ्यासच करत असतात का? याकडे लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ नाही. मोबाईलच्या अतिवापरामुळे हा प्रकार घडल्याची भीती व्यक्त होते आहे.
Crime: 15 वर्षीय मुलीवर ‘निर्भया’सारखा पाशवी बलात्कार, गुप्तांगातून प्रचंड रक्तस्त्राव; पीडिता ICU मध्ये
नेमकं प्रकरण आहे तरी काय?