देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील १२ जणांना मिळू शकते संधी; कसं असेल नवं मंत्रिमंडळ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारा शिंदे गट आणि भाजप युतीचं सरकार राज्यात येणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. सरकार स्थापनेसाठीची लगबग सुरू असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ कसं असेल, याची संभावित यादी समोर आली आहे. यात बंडखोरी केलेल्या १२ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र भाजप आणि शिंदे गटात चर्चा सुरू असून, मुंबईत आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे. शिंदे गटातील आमदारांच्या समर्थनाचं पत्र घेऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलीये.

फडणवीस-शिंदे हे लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं प्रयत्न करत असून, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याबद्दलची संभावित यादी समोर आली आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंचा राजीनामा! राज्यात आता शिंदे-फडणवीसांचं सरकार; एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

कॅबिनेटमध्ये कुणाला मिळू शकतं स्थान?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस -मुख्यमंत्री

ADVERTISEMENT

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन

आशिष शेलार

प्रविण दरेकर

चंद्रशेखर बावनकुळे

विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख

गणेश नाईक

राधाकृष्ण विखे पाटील

संभाजी पाटील-निलंगेकर

मंगल प्रभात लोढा

संजय कुटे

रवींद्र चव्हाण

डॉ. अशोक उईके

जयकुमार रावल

अतुल सावे

देवयानी फरांदे

रणधीर सावरकर

माधुरी मिसाळ

“उद्धव ठाकरेंनी हे आधीच सांगितलं असतं, तर बाहेरून पाठिंबा देण्याची आमची तयारी होती”

भाजपतून कुणाला बनवलं जाऊ शकतं राज्यमंत्री?

प्रसाद लाड

जयकुमार गोरे

प्रशांत ठाकूर

मदन येरावर

महेश लांडे वा राहुल कुल

निलय नाईक

गोपीचंद पडळकर

बंटी बगाडिया

शिंदे गटातील कुणाला मिळू शकते संधी?

एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)

गुलाबराव पाटील

उदय सामंत

दादा भुसे

अब्दुल सत्तार

संजय राठोड

शंभूराज देसाई

बच्चू कडू

तानाजी सावंत

Uddhav Thackeray: “मी आज सगळ्या महाराष्ट्राच्या साक्षीने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतो आहे”

शिंदे गटातील या आमदारांना बनवलं जाऊ शकतं राज्यमंत्री?

दीपक केसरकर

संदिपान भुमरे

संजय शिरसाट

भारत गोगावले

बैठकांचा सपाटा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आता भाजप आणि शिंदे गटातील हालचाली वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची दुपारी बैठक होणार असून, त्यानंतर दोन्ही नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील, अशी माहिती सध्या हाती येत आहे.

काही तासांत स्थापन होणार सरकार

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात आता भाजपच्या सत्ता स्थापनेचे वेध लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन होणार हे निश्चित मानलं जात आहे. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार असून, आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं समजतं. त्यानंतर आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी फडणवीस शपथ घेतील, अशी माहिती आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT