Maharashtra Cyclone impact : 18 जणांचा मृत्यू आणि 28 जण जखमी
महाराष्ट्रात आलेल्या तौकताई Tauktae चक्रीवादळाने हाहाकार माजवला. या वादळामुळे महाराष्ट्रात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध 11 हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. तर 10 हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालं आहे. आत्तापर्यंत 13 […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आलेल्या तौकताई Tauktae चक्रीवादळाने हाहाकार माजवला. या वादळामुळे महाराष्ट्रात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 28 जण या वादळाच्या तडाख्यात जखमी झाले आहेत. मुंबईत वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. राज्यातल्या विविध 11 हजार ठिकाणी नुकसान झालं आहे. तर 10 हजार हेक्टर शेती क्षेत्र वादळामुळे बाधित झालं आहे. आत्तापर्यंत 13 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातकडे मार्गस्थ झालं असलं तरीही या वादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. आधीच कोरोनाचं संकट सहन करणाऱ्या राज्याला आता या वादळाच्या संकटाचाही सामना करावा लागला आहे.
सोमवारी दिवसभरात काय काय घडलं?
सोसाट्याचा वारा सुटल्याने मुंबईतल्या घाटकोपर-विक्रोळीच्या दरम्यान लोकल ट्रेनवर झाडाच्या फांद्या पडल्या. त्यामुळे काही काळासाठी मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. सावधगिरीचा इशारा म्हणून काही ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली त्यानंतर पूर्ववत करण्यात आली .
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घटल्या. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया या सुप्रसिद्ध वास्तूजवळ असलेल्या रस्त्यांवरही पाणी जमा झालं होतं.









