Viral Video: पुण्यातील गणेशोत्सवात तृतीयपंथीयांचा धमाका! असं नृत्य कधी पाहिलं नसेल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Transgender Shikhandi Group Video
Transgender Shikhandi Group Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील तृतीयपंथीयांच्या शिखंडी पथकाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

point

महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांच्या पहिल्या पथकाने सादर केलं भन्नाट नृत्य

point

तृतीयपंथीयांचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Transgender Dhol Tasha Viral Video : देशभरात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात गणेश उत्सव धुम धडाक्यात साजरा होत आहे. 7 सप्टेंबरला गणरायाचं आगमन झाल्यापासून विसर्जन सोहळ्यापर्यंत हा उत्सव सुरु राहणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त पूजा-अर्जा करण्यात व्यग्र असतात. अशातच पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तृतीयपंथीयांच्या पथकाने सर्वांच्या भुवया उंचावून टाकल्या आहेत. महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांच्या पहिल्या ढोल ताशा पथक 'शिखंडी'ने अप्रतिम पदर्शन केलं आहे.(Ganeshotsav is celebrated with great enthusiasm across the country. Specially, Ganesh Utsav is celebrated with great pomp in Maharashtra)

ADVERTISEMENT

तृतीयपंथीयांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पुण्यात तृतीयपंथीयांच्या शिखंडी ढोल-ताशाच्या पथकाने अप्रतिम डान्स करून अनेकांचं मनोरंजन केलं. या ग्रुपचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या ग्रुपमध्ये 25 सदस्य आहेत. यापैकी अधिक जण तृतीयपंथी आहेत. या ग्रुपचे सदस्य कंबरेवर ढोल बांधून पूर्ण जल्लोषात नृत्य सादर करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

 हे ही वाचा >> Lucknow Building Collapse: बघता बघता इमारत पत्त्यांसारखी कोसळली! 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

इथे पाहा तृतीयपंथीयांच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची परंपरा जपण्यासाठी या ग्रुपने नृत्य सादर केलं आहे. पुण्यात दहा दिवस चालणारा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. पुण्यातील पाच गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपतीसह अनेक प्रसिद्ध मंडळांचे गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पुण्यात येतात.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Today Horoscope : जगण्याचा संघर्ष संपणार! 'या' राशींच्या लोकांचं नशीब चमकणार

इन्स्टाग्रामवर पोस्ट केला व्हिडीओ

राज्यात पहिल्या थर्ड पार्टी ढोल-ताशा पथकाला शिखंडी नाव देण्यात आलं आहे. या ग्रुपचा इन्स्टाग्रामवर एक अकाऊंटही आहे. यावर ग्रुपचे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ढोल-ताशा मंडळ शिखंडीने त्यांच्या पहिलं नृत्य सादर केलं आहे. याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT