Lucknow Building Collapse: बघता बघता इमारत पत्त्यांसारखी कोसळली! 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO

मुंबई तक

ADVERTISEMENT

Lucknow Building Collapse Latest Update
Lucknow Building Collapse Latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चार वर्षांपूर्वीच बांधलेली इमारत कोसळली

point

या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू, तर 28 जखमी

point

इमारत कोसळण्याचं नेमकं कारण काय?

Lucknow Building Collapse : लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि जिल्हा प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. चार वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली इमारत कोसळल्यामुळं 28 जण जखमी झाले आहेत. जखमींना लोक बंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्यानंतर ही दुर्देवी घटना घडली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या मलब्यातून आठ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. रिलीफ कमिश्नर जीएस नवीन यांनी म्हटलंय की, एसडीआरएफने रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आणखी तीन जणांचा मृतदेह बाहेर काढला आहे. राज किशोर (27), रुद्र यादव (24) आणि जागरुप सिंह (35) अशी मृतांची नावं आहेत. याआधी धीरज गुप्ता (48), पंकज तिवारी (40), अरुण सोनकर (28), राकेश लखनपाल (67) आणि जसप्रीत सिंह साहनी (41) यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT