Bhagat Sing Koshyari म्हणतात मी स्वतःला राज्यपाल मानतच नाही

मुंबई तक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाची चर्चा कायमच होते. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात. पुण्यात त्यांनी एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं आहे त्यामुळे वाद निर्माण होणार नसला तरीही राज्यपाल चर्चेत आले आहेत. पुण्यातील विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाची चर्चा कायमच होते. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात. पुण्यात त्यांनी एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं आहे त्यामुळे वाद निर्माण होणार नसला तरीही राज्यपाल चर्चेत आले आहेत.

पुण्यातील विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने गौरविण्यात करण्यात आले. त्यावेळी भगतसिंह कोश्यारी यांचे भाषण सुरू झाले.त्यावेळी त्यांच्या समोरील बाजूला कॅमेरामन रेकॉर्डिंग करीता उभे होते.त्यावेळी त्यांच्या मागील बाजूस एक महिला बसली होती.ती जागेवर उभी राहून, राज्यपाल महोदय या कॅमेरामनमुळे तुम्ही दिसत नाही.तर तुम्ही दुसर्‍या बाजूच्या डायसवर येऊन बोलाव अशी विनंती केली.

त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपको भाषण सुनना है, या देखना है अशी मिश्किलपणे टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला. तर त्याही पुढे जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, मै मानता ही नही हू की मै राज्यपाल हू, तो थोडी ही लोग मेरे बीच बीच मे बोलते रहते. तो आप जो बोलेगी वही होगा असे ते म्हणाले, त्यानंतर कॅमेरामन बाजूला झाल्यावर राज्यपालांच्या भाषणाला सुरुवात झाली.

आपल्या समस्या संपल्या पाहिजे.यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयत्न करीत आहे. पण अजून सगळ्या समस्या संपल्या नाही.देशातून भ्रष्टाचार संपला नाही.पण प्रयत्न सुरू आहे.अशी भूमिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp