महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोण कोणत्या वादांमुळे चर्चेत राहिले?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता माफी मागितली आहे. शनिवारी त्यांचं एक वक्तव्य व्हायरल झालं होतं, ज्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर त्यांनी ट्विट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगितलं. अखेर या प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे. मात्र वाद […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता माफी मागितली आहे. शनिवारी त्यांचं एक वक्तव्य व्हायरल झालं होतं, ज्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर त्यांनी ट्विट करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगितलं. अखेर या प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे. मात्र वाद आणि भगतसिंह कोश्यारी यांचं नातं काही नवं नाही. महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यापासूनच ते वादग्रस्तच ठरले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबईबाबत काय म्हटलं होतं?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसले. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ज्यानंतर आता त्यांनी अखेर माफी मागितली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी!
मात्र राज्यपालपदी बसल्यापासूनच वाद सुरू झाले आहेत. आपण या बातमीतून त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.