OBC आरक्षणाशिवाय पार पडलेल्या 106 नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांचा आज निकाल
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचायतीच्या खुल्या जागांवर मतदान होतं आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असणाऱ्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठीही मतदान पार पडलं आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी मंगळवारी सकाळी मतदान सुरू झालं होतं. तसंच 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतादन पार पडलं. आता आज निकाल जाहीर […]
ADVERTISEMENT
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचायतीच्या खुल्या जागांवर मतदान होतं आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असणाऱ्या पंचायत समितीच्या 45 जागांसाठीही मतदान पार पडलं आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी मंगळवारी सकाळी मतदान सुरू झालं होतं. तसंच 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतादन पार पडलं. आता आज निकाल जाहीर होणार आहेत. सगळ्या ठिकाणी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.
ADVERTISEMENT
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. तसंच चार विविध महानगरपालिकांतील चार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुनंतर या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार काल मतदान पार पडलं. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडलं.
राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडलं. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होतं. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्यानं तिथं मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी काल मतदान झालं.
हे वाचलं का?
भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10, तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठीदेखील मंगळवारी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 73 टक्के मतदान झालं. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी 76 टक्के मतदान झालं. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीसुद्धा प्राथमिक अंदाजानुसार, 50 टक्के मतदान झालं. या सर्व ठिकाणी आता 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT