Raj Thackeray : ‘भाजपने लक्षात ठेवावं, आज भरती, उद्या ओहोटी येणारच!’
MNS Chief Raj Thackeray speech : ठाणे : भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे नैसर्गिक आहे. भाजपने (BJP) हे लक्षात ठेवावं, आज भरती आहे, उद्या ओहोटी येणारच. कारण हे नैसर्गिक आहे, हे कोणी थांबवू नाही शकणार, असा जाहीर इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला दिला. ते मनसेच्या (MNS) १७ वर्धापनदिन सोहळ्यात बोलत […]
ADVERTISEMENT
MNS Chief Raj Thackeray speech :
ADVERTISEMENT
ठाणे : भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे नैसर्गिक आहे. भाजपने (BJP) हे लक्षात ठेवावं, आज भरती आहे, उद्या ओहोटी येणारच. कारण हे नैसर्गिक आहे, हे कोणी थांबवू नाही शकणार, असा जाहीर इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपला दिला. ते मनसेच्या (MNS) १७ वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. (MNS Chief Raj Thackeray is holding a public meeting in Thane.
राज ठाकरे काय म्हणाले?
मागील १७ वर्षांच्या कामाचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. पक्ष कोणत्या परिस्थितीतून गेला, कुठल्या परिस्थितीतून जात आहे. काही जण सोडून गेले हे खरं आहे, परंतु ते एक एकटे गेले. एकत्रित गेले नाहीत. मग आपल्याला प्रश्न विचारतात लोकं राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मग मतं का नाही मिळत? मग १३ आमदार काय सोरटवर आले होते का?, असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला.
हे वाचलं का?
२०१४ काय २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट होती. मला काय विचारता १७ वर्षात काय केलं, काँग्रेसची काय अवस्था बघा. ज्या पक्षाने या देशावर ६०-६५ वर्ष राज्य केलं, त्यांची अवस्था बघा. भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे नैसर्गिक आहे. भाजपनेही लक्षात ठेवावं, आता भरती आहे, ओहोटी येणार, कारण हे नैसर्गिक आहे, हे कोणी थांबवू नाही शकणार, असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray : ‘संधी देण्यास मनसे उत्सुक’, राज ठाकरेंचं महिला दिनानिमित्त खास पत्र
ADVERTISEMENT
आमदार राजू पाटलांचं कौतूक :
यावेळी राज ठाकरे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांचं कौतूक केलं. ते म्हणाले, राजू पाटील आज एकटा बाजू मांडतं आहे. ते शोलेमध्ये डायलॉग आहे ना, एकही है लेकीन काफी है. ही विधानसभा भरली तर काय होईल यांचं?
ADVERTISEMENT
आंदोलन अर्धवट सोडतात, असा दावा करतात. पण एक आंदोलन दाखवायचं अर्धवट सोडलेलं, एक. सगळ्या जबाबदाऱ्या आमच्याच आहेत का? जे पत्रकार आम्हाला प्रश्न विचारतात ते इतर पक्षांना प्रश्न विचारतात का? ज्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील ६५ ते ७० टोलनाके बंद झाले, तेच शिवसेना-भाजप जे अडीच वर्षांपूर्वी गळ्यात गळे घालून फिरणाऱ्यांनी जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्यांचं काय झालं, हे त्यांना कोणी का विचारतं नाही. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा, असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray: ‘तो आवाज तितकाच आत ओढत राहील’, राज ठाकरे झाले भावूक
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणात काय म्हणाले राज ठाकरे?
काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क परिसरात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला होता. यावेळी राज ठाकरेंनी देशपांडे यांना मंचावर पाचारण केलं. त्यांच्याकडे बघत ते म्हणाले, आत्मचरित्राची चार पानं वाढली. “पण एक सांगतो, ज्याने हे केलंय, त्याला पहिलं समजेल की हे त्यांनी केलंय, मग सगळ्यांना कळेल की हे त्यांनी केलंय. माझ्या मुलांचं रक्त मी वाया घालवू देणार नाही, महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत, असल्या फडतूस लोकांसाठी नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT