महाराष्ट्रात मंगळवारपासून 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटासाठी Free Vaccination

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात मंगळवापासून 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटासाठी सरकारी केंद्रांवर लस मोफत मिळणार आहे. तसंच एक अद्ययावत असा डॅशबोर्डही तयार करण्यात आला आहे. ज्यावर आरोग्य सुविधा, ऑक्सिजन, आरोग्याच्या पायाभूत सुविधा या सगळ्या अद्ययावत करण्यात येतील असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट 4.4 आहे. तर रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. तसंच एक महत्त्वाचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. रविवारपर्यंत आपण 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींचंच लसीकरण करत होतो. मात्र लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा आहे. त्यामुळे 18 पासून पुढच्या सर्व वयोगटाला मंगळवारपासून लसी मिळणार आहेत. सरकारी लसीकरण केंद्रांवर या लसी मोफत दिल्या जातील. महाराष्ट्रातील तरूणाईला मी हे सांगेन की आपल्या जिल्ह्यातल्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस तुम्ही घेऊ शकता.

डेल्टा प्लस या व्हेरिएंट संदर्भात माहिती सांगावीशी वाटते. या महाराष्ट्राने प्रत्येक जिल्ह्यातील शंभर सॅम्पल्स घेण्यास सुरूवात केली. यासाठी CSIR आणि IGIB या संस्थांचा सहभाग यामध्ये घेतला आहे. तसंच NCDC चा सपोर्टही घेतला आहे. 15 मेपासून आजवर साधारण साडेसात हजारांच्यावर नमुने घेण्यात आलं. ज्याचं होल जेनोमिक्स करण्यात आलं. या साडेसात हजार नमुन्यांपैकी 21 नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस हा व्हेरिएंट सापडला. या 21 केसेस रत्नागिरी 9, जळगाव 7, मुंबई 2, पालघर 1, सिंधुदुर्ग 1 आणि ठाणे 1 अशा आहेत. अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यासंदर्भात आता पुढील कार्यवाही अशी करण्यात येते आहे की या संपूर्ण केसेसची सखोल माहिती घेतली जात आहे. त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री, त्यांनी लस घेतली आहे का? त्यांनी लस घेतल्यावरही त्यांना कोरोनाची बाधा झाली का? या सगळ्याची माहिती घेण्यात येते आहे. हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट्स हे सगळं आपण तपासत आहोत असंही राजेश टोपे यांनी सांगतिलं आहे.

या सगळ्यासोबत ILI आणि SARI यांचा सर्व्हेही करत आहोत. डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या अनुषंगाने या सूचना देण्यात आल्या आहेत. डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या अनुषंगाने जे म्युटेशन झालं आहे त्यामध्ये जी माहिती समोर आली आहे त्यात असं लक्षात आलं की डेल्टा प्लस व्हेरिएंटचं संक्रमण वेगाने होत नाही. मात्र हा व्हेरिएंट घातक आहे. व्हॅक्सिनलाही तो व्हेरिएंट बायपास करू शकतो का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यासंदर्भात जास्त नमुने तपासून त्याचा अभ्यास सुरू आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT