एकनाथ शिंदेंचं थेट ‘मातोश्री’ला चॅलेंज! शिवसेनेचा व्हीप ठरवला अवैध, केली मोठी घोषणा

मुंबई तक

शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी आता थेट मातोश्रीलाच आव्हान दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षातील असंख्य आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्यानं शिवसेनेनं बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेनं व्हीप जारी केला. मात्र, हा व्हीप शिंदे यांनी अवैध ठरवला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेनं बैठक बोलावली आहे. तसा व्हीप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांनी आता थेट मातोश्रीलाच आव्हान दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षातील असंख्य आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्यानं शिवसेनेनं बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेनं व्हीप जारी केला. मात्र, हा व्हीप शिंदे यांनी अवैध ठरवला आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेनं बैठक बोलावली आहे. तसा व्हीप शिवसेनेकडून जारी करण्यात आला आहे. शिवसेनेच्या व्हीपलाच एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिलं आहे.

बैठकीला उपस्थित राहण्याबाबत शिवसेनेनं आमदारांसाठी व्हीप जारी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिलीये. “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत,” असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

‘भाजपला सरकार पाडण्यात यश मिळणार नाही’, राष्ट्रवादी नेत्याचा दावा

हे वाचलं का?

    follow whatsapp