एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली
७ ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा फैसला लागणं बाकी आहे. यासाठी आजची तारीख देण्यात आली होती. एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे हा सामना थेट सुप्रीम कोर्टात गेला आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून दोन याचिका आणि ठाकरे गटाकडून चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर गेल्या काही सुनावण्यांमध्ये हरिश साळवे, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यातला […]
ADVERTISEMENT

७ ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा फैसला लागणं बाकी आहे. यासाठी आजची तारीख देण्यात आली होती. एकनाथ शिंदे विरूद्ध उद्धव ठाकरे हा सामना थेट सुप्रीम कोर्टात गेला आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून दोन याचिका आणि ठाकरे गटाकडून चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर गेल्या काही सुनावण्यांमध्ये हरिश साळवे, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यातला युक्तिवाद आपण पाहिला, वाचला आहे. सुप्रीम कोर्टासमोर उद्याही या याचिकांवर फैसला होणार नाही. २२ ऑगस्ट रोजी टळलेली सुनावणी मंगळवारी (२३ ऑगस्ट) होईल, अशी चर्चा होती, मात्र सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणाऱ्या चार याचिका
ज्या चार याचिका सुप्रीम कोर्टात आहेत त्या महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या आहेत. तसंच शिवसेनेचंही भवितव्य ठरवणाऱ्या आहेत. उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असा हा सामना आहे. चीफ जस्टिस एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर यू. यू. लळित हे त्यांची जागा घेतील. अशात या याचिका अद्याप प्रलंबित आहेत त्यासाठी तारीख पे तारीख दिली जाते आहे.
कोणत्या चार याचिकांवर सुनावणी अपेक्षित आहे?
उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे : याचिका क्रमांक १
महाविकास आघाडी सरकार असताना जेव्हा एकनाथ शिंदे गट बाहेर पडल्याने ते अल्पमतात आलं तेव्हा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटीस बजावली. या कारवाईच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी एक तर भारत गोगावले आणि १४ आमदारांनी या नोटिशीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. २७ जूनला या १६ आमदारांना १२ जुलैपर्यंतचं उत्तर देण्याची मुदवाढ देण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होणार आहे.