एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरेनींही थोपटले दंड! आता राज्यात पुढे काय होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे आणि आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नवनव्या नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे अधिकाधिक आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनं तब्बल १६ बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पाऊल उचललं आहे. या आमदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घेतला असून, बंडखोर आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं आहे. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या बैठकांवर बैठका सुरू असून, भाजपच्याही पडद्यामागे वेगात हालचाली सुरू आहेत.

‘बाबा योगराज!’ एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे फटकारे; बंडखोर आमदारांच्या वर्मावरही ठेवलं ‘बोट’

हे वाचलं का?

१६ आमदारांना नोटीस

उद्धव ठाकरे यांच्या आवाहननंतरही बंडखोर आमदार भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाईचं पहिलं पाऊल टाकलं. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांचा दरवाजा ठोठावला.

ADVERTISEMENT

शिवसेनेनं १६ आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. या आमदारांना २६ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं जाणार आहे.

ADVERTISEMENT

Arvind Sawant : एकनाथ शिंदे आणि बंडखोरांनी शिवसेनेचे दरवाजे स्वतःसाठी बंद केले आहेत

ते १६ आमदार कोण?

१) संजय शिरसाट

२) अब्दुल सत्तार

३)भरत गोगावले

४) संदीप भामरे

५) महेश शिंदे

६) अनिल बाबर

७) बालाजी कल्याणकर

८) एकनाथ शिंदे

९) लता सोनावणे

१०) प्रकाश सुर्वे

११) यामिनी जाधव

१२) तानाजी सावंत

१३) रमेश बोरनारे

१४) चिमणराव पाटील

१५) संजय रायमूलकर

१६) बालाजी किणीकर

शिंदे गटाच्या बंडामागे ठाकरे नाही

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार केलेलं आहे, अशी कुजबूज बंडाळी उफाळून आल्यापासून सुरू होती. मात्र, शुक्रवारी शिवसेनेनं बोलावलेल्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला. सर्वच बैठकांमध्ये याचा पुनरुच्चार करत करत उद्धव ठाकरे यांनी हे बंड करायला मी सांगितलेलं नाही, असं सांगितलं. शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपचा डाव आहे, असं ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीबद्दल उद्धव ठाकरेंना आधीच कळलं होतं, फोनही केला, पण…; शिवसैनिकांना सांगितलं काय घडलं?

एकनाथ शिंदे कशाची वाटतेय भीती?

सध्या शिवसेना बंडखोर आमदारांचा मुक्काम सध्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहे. तेथून बंडखोर आमदार पत्र आणि व्हिडीओतून भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आपल्याकडे असल्याचा दावा केला जात. मात्र, अपेक्षित आमदार सोबत असूनही शिंदे यांच्याकडून कोणतंही पाऊल का उचललं जात नाही, अशी चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात असला, तरी मुंबईत परतल्यानंतर त्यातील आमदार फुटले, तर काय? अशी भीतीही त्यांना असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेकडूनही हॉटेलमध्ये असलेले आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

कायदेशिर पेच निर्माण होण्याची चिन्हं

शिवसेनेने व्हीपचं पालन केलं नसल्याचं सांगत १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केलीये. मात्र, अपक्ष आमदारांनी उपाध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव असल्यामुळे त्यांना याबद्दलचे अधिकार नाहीत, असं आमदारांनी म्हटलंय. त्यामुळे हा मुद्दा शिंदे गटाकडून उपस्थित केला जाऊ शकतो.

शिवसेनेच्या बैठकीत होणार निर्णय?

शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे नियुक्त्यांपासून निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रीय कार्यकारणीने पक्षप्रमुखांना दिलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षावर दावा केला जाऊ शकतो, अशी चर्चा असून, आता एकनाथ शिंदेंसह बंडखोरांवर पक्षाच्या पातळीवर कारवाई करण्याच्या भूमिकेत शिवसेना दिसत आहे. आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीकडे शिवसैनिकांसह बंडखोर आमदारांचंही लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT