महाराष्ट्रात 16 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 261 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

महाराष्ट्रात 16 हजार 369 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.45 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 10 हजार 989 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 261 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात 16 हजार 369 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.45 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 10 हजार 989 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 261 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.74 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 71 लाख 28 हजार 93 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 63 हजार 880 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 11 लाख 35 हजार 347 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 6 हजार 494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

कोरोना लसीच्या पुरवठ्यावरुन नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात चर्चा

राज्यात आज घडीला 1 लाख 61 हजार 684 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर राज्यात आज 10 हजार 989 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 58 लाख 63 हजार 880 इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp