Maharashtra Corona Update : राज्यात आढळले ४,६६६ कोरोनाबाधित; १३१ जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अभूतपूर्व चित्र झालेल्या महाराष्ट्रातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजूनही जाणवत असून, दिलासादायक बाबम्हणजे कोरोना रुग्णसंख्या चार ते पाच हजारांच्या दरम्यान स्थिरावली आहे. आज राज्यात ४ हजार ६६६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात ४ हजार ६६६ रुग्णांची भर पडली. दर दिवसभरात ३ हजार ५१० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६२ लाख ६३ हजार ४१६ इतकी झाली आहे.

राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही दिलासादायक आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९७ टक्के इतका आहे. दरम्यान, राज्यात आज १३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर सध्या २.१२ टक्के असून, गेल्या आठवड्याच्या सुरूवातीला २.११ टक्के इतका होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यात आतापर्यंत ५,३६,५९,६१३ नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या नमुन्यांपैकी ६४,५६,९३९ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २,९१,५२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. २,३१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असून, राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ५२ हजार ८४४ इतकी आहे.

राज्यात पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १३,५०३ रुग्ण उपचाराधीन आहेत. तर राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्या १०० च्या आत आहे. यामध्ये जळगाव (४८), नंदूरबार (२), धुळे (२०), जालना (३३), परभणी (३६), हिंगोली (५९), नांदेड (३२), अकोला (२३), वाशिम (६), बुलढाणा (५०), यवतमाळ (७), नागपूर (७४), वर्धा (५), भंडारा (८), गोंदिया (४), गडचिरोली (३२) या जिल्ह्यांमध्ये उपचाराधीन रुग्णसंख्या शंभरच्या खाली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत आज दोनच मृत्यू…

ADVERTISEMENT

मुंबईत गेल्या काही दिवसांत किंचित प्रमाणात रुग्णवाढ झाल्याचं दिसत आहे. आज दिवसभरात ३४५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर २८० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत दोन मृत्यूंचीच नोंद झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT