Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता
कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यासाठी सतर्कचेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

हिवाळ्याची आणखी वाट पाहावी लागणा

कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?
राज्यात एकीकडे मोठ्या उत्साहात, दिवाळी, पाडवा हे सण साजरे केले जातायत, फटाके फोडले जातायत. तर दुसरीकडे आता हिवाळ्याचीही चाहुल लागलेली आहे. मात्र थंडीची आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण हवमान विभागाच्या अंदाजानुसार आता कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यासाठी सतर्कचेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हे ही वाचा >>Kitchen Tips: अरेरेरे! कपडे-पडदे, बेडशीटवर लागलेत तेलाचे डाग? 'या' सोप्या ट्रिक्सने होतील झटपट स्वच्छ
हवमान विभागाने आज राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड आणि मध्य महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळच्या सुमारास हा पाऊस होऊ शकतो.