जैन इरिगेशनचे भवरलाल जैन यांच्या पोर्ट्रेटची गिनीज बुकमध्ये नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तक: जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जळगावमध्ये तयार करण्यात आलेली मोजेक पोर्ट्रेटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. भवरलाल जैन यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आले. जैन पाईप्सचा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ही प्रतिकृती साकारलीय. गुरुवारी 25 फेब्रुवारी रोजी या प्रतिकृतीचं लोकार्पण करण्यात आलं.

ADVERTISEMENT

१८ हजार चौरस फुटांवर ही प्रतिकृती साकरली असून. जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद जागेवर सुमारे १८ हजार चौरस फुटांवर मोजेक प्रकारातील ही कलाकृती साकारण्यात आली आहे.

भवरलाल जैन यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला, त्याचाच वापर करुन ही कलाकृती साकारण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार तीन रंगाच्या पीई आणि पीव्हीसी पाईप्सचा उपयोग करून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.

हे वाचलं का?

या पोर्ट्रेटसाठी २५ मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग पीई पाईप तर पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पीव्हीसी पाईप या कलाकृतीत वापरण्यात आले आहेत.

१६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान सात दिवस दिवसाचे १४ तास असं एकूण ९८ तास या कलाकृतीसाठी काम सुरू होतं. जैन व्हॅली भाऊंच्या वाटिकेत ही कलाकृती पर्यटकांना पाहता येणार आहे.

ADVERTISEMENT

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यासाठी विशिष्ट प्रोटोकॉल असतो. त्यानुसार ज्या ठिकाणी विक्रम होत असतात अशा मोकळ्या जागेची निवड करण्यापासून तर ते पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ चित्रण करण्यात आले. तसेच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद होताना तुकड्या तुकड्याने प्रत्येक व्हिडिओची बारकाईने नोंद घेण्यात आलीय.

ADVERTISEMENT

या जागतिक विक्रमाच्या नोंदीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्यावतीने स्वप्नील डांगरीकर (नाशिक) व निखील शुक्ल (पुणे) या महाराष्ट्रातील प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी ही पूर्ण कलाकृती ऑनलाईन पाहिली. त्यांच्यावतीने स्वप्नील डांगरीकर यांच्याहस्ते गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT