रेशनकार्ड केशरी असो की पांढरं… Mucormycosis च्या रुग्णाचा सर्व खर्च सरकार करणार: राजेश टोपे
मुंबई: कोरोना पाठोपाठ Mucormycosis (काळी बुरशी) या नव्या आजाराने महाराष्ट्राला आता विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात या आजाराचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. राज्यात जवळजवळ 1500 हून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली होती. ज्यापैकी 500 रुग्ण हे बरे झाले आहेत तर आतापर्यंत या आजाराने महाराष्ट्रात 90 जणांचा जीव घेतला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोरोना पाठोपाठ Mucormycosis (काळी बुरशी) या नव्या आजाराने महाराष्ट्राला आता विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात या आजाराचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. राज्यात जवळजवळ 1500 हून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली होती. ज्यापैकी 500 रुग्ण हे बरे झाले आहेत तर आतापर्यंत या आजाराने महाराष्ट्रात 90 जणांचा जीव घेतला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात Mucormycosis चे 800 ते 850 रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. अशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (19 मे) पत्रकार परिषद घेऊन एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
यावेळी राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे की, Mucormycosis या आजाराची लागण झालेल्या रुग्णांवर आता शासन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सर्व खर्च करणार आहे.
यावेळी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे की, पिवळं, केशरी किंवा अगदी पांढऱ्या रंगाचं रेशनकार्ड असलं तरीही म्युकोरमायकोसिस असलेल्या रुग्णावर पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. पाहा याबाबत राजेश टोपे नेमकं काय म्हणाले:
‘म्युकोरमायकोसिस आजाराच्या बाबतीत सध्याच्या घडीला सगळ्यायत महत्त्वाची अडचण ही आहे की, त्या आजारात उपचारासाठी लागणाऱ्या ‘अॅम्फोटेरिसिन बी’ या इंजेक्शनची कमतरता. कारण साधारण दररोज सहा इंजेक्शन हे प्रत्येक रुग्णाला लागतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करणार आहोत. याबाबत मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील ज्या लोकांकडे कोणतं ना कोणतं रेशनकार्ड आहे मग ते पिवळं असो, केशरी किंवा पांढरं असो. त्यांचा देखील या आजारावरील उपचारांसाठी अंतर्भाव करण्यात आला आहे.’ असं राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.










