महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार-फडणवीस
महाविकास आघाडी सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून केली जाईल हा माझा दावा आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पाहण्यास मिळाला त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणजे हे सरकार आहे हे दिसतं आहे. महाविकास […]
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून केली जाईल हा माझा दावा आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पाहण्यास मिळाला त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणजे हे सरकार आहे हे दिसतं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आता एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागणार आहे, आता कोरोनाचं कारण देऊन आम्हाला सरकार रोखू शकत नाही असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घणाघाती टीका केली.
महाराष्ट्रात सरकारचं अस्तित्व आहे का? फडणवीसांचा खोचक प्रश्न
ठाकरे सरकारच्या काळात हजारो कोटींची लूट सुरू आहे. कायद्याचं राज्य नाही तर काय देता ते बोला असं सध्या राज्यात सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात एल्गार पुकारावाच लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सुधीर मुनगंटीवार यांनी जो प्रस्ताव मांडला त्यात या सरकारचे कपडे काढले. पण हे सरकार निर्लज्ज आहे त्यांचे कितीही कपडे काढले तरीही त्यांना फरक पडत नाही असाही टोला फडणवीस यांनी लगावला.