अभिनेते सोनू सूद किंवा सलमानला देशाचं पंतप्रधान बनवा; राखी सावंतची मागणी
देशावरचं अजून कोरोनाचं संकट अजून काही टळलेलं नाही. गेल्या वर्षापासून भारत कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. देश संकटात असताना अनेक बॉलिवूड कलाकारांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला. यामध्ये अभिनेता सोनू सूद याचं नाव पहिलं घेतलं जातं. तर आता अभिनेत्री राखी सावंत हिने थेट सोनू सूदला पंतप्रधान बनवण्याची मागणी केली आहे. एका वेबासाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने ही […]
ADVERTISEMENT

देशावरचं अजून कोरोनाचं संकट अजून काही टळलेलं नाही. गेल्या वर्षापासून भारत कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. देश संकटात असताना अनेक बॉलिवूड कलाकारांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला. यामध्ये अभिनेता सोनू सूद याचं नाव पहिलं घेतलं जातं. तर आता अभिनेत्री राखी सावंत हिने थेट सोनू सूदला पंतप्रधान बनवण्याची मागणी केली आहे.
एका वेबासाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने ही मागणी केली आहे. राखीचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये राखीने सोनू सूद सोबत अभिनेता सलमान खानलाही पंतप्रधान बनवण्याची मागणी केली आहे.
कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सोनू निगम पुढे सरसावला; ऑक्सिजन पुरवठ्याची करणार मदत
राखी या व्हीडिओमध्ये म्हणते, मी म्हणते की सोनू सूद आणि सलमान खान यांच्या पैकी कोणी पंतप्रधान झालं पाहिजे. कारण ते खरे हीरो आहेत. सोनू सूद, सलमान खान, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन आपल्या देशातील लोकांवर किती प्रेम आणि मदत करत आहेत.”
‘कंगना तू देशाची सेवा कर…’; राखी सावंतचा अभिनेत्री कंगनावर निशाणा
दरम्यान काही दिवसांपूर्वी राखी सावंतने अभिनेत्री कंगना राणौतवर निशाणा साधला होता. एका व्हीडिओमध्ये बोलताना राखी म्हणाली होती, “कंगना तू देशाची सेवा कर. तुझ्याकडे करोडो रुपये आहेत. तर त्यामधील थोडे पैसे ऑक्सिजन खरेदीसाठी खर्च कर आणि लोकांना मदत कर.”