विदेशात राहून राजकारण कसं होईल? ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला

मुंबई तक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे साहजिकच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिसरी आघाडी उभी राहणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र भाजपला सक्षम पर्याय हवा असं म्हणत असतानाच ममता बॅनर्जींनी राहुल गांधींवरही टीका केली आहे. विदेशात राहून राजकारण कसं होईल? असा प्रश्न ममता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे साहजिकच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी तिसरी आघाडी उभी राहणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र भाजपला सक्षम पर्याय हवा असं म्हणत असतानाच ममता बॅनर्जींनी राहुल गांधींवरही टीका केली आहे. विदेशात राहून राजकारण कसं होईल? असा प्रश्न ममता बॅनर्जींनी उपस्थित केला आहे.

Sharad Pawar हे विरोधकांचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय आकर्षण-संजय राऊत

तुम्ही काँग्रेसविरोधात का लढत आहात? असा सवाल त्यांना करण्यात आला. काँग्रेस आणि डावे पक्ष बंगालमध्ये आमच्याविरोधात लढू शकतात तर आम्हीही त्यांच्याविरोधात जाऊ शकतो. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्हाला ही लढाई लढावीच लागेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला सगळ्या पक्षांनी लढण्याची इच्छा असेल तरच भाजपच्या विरोधात राष्ट्रीय पर्याय तयार केला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp