सातारा : गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
– इम्तियाज मुजावर, सातारा एका गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सिंधू सानप असं वनरक्षक महिला कर्मचाऱ्याचं नाव असून, रामचंद्र […]
ADVERTISEMENT
– इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
एका गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सिंधू सानप असं वनरक्षक महिला कर्मचाऱ्याचं नाव असून, रामचंद्र जानकर असं मारहाण करणाऱ्या माजी सरपंचाचं नाव आहे. यावेळी माजी सरपंचाच्या पत्नीने सिंधू सानप यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना चप्पलेनं मारहाण केली.
हे वाचलं का?
साताऱ्यात पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. वनरक्षक महिला कर्मचारी सिंधू सानप या 3 महिन्यांची गर्भवती असून, त्यांच्या पोटात लाथा आल्याचा आरोप सरपंचावर करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या डोक्यात दगड देखील मारल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
‘मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले’ असं म्हणत वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेप्रकरणी वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून, मारहाणीचा विडिओ व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
साताऱ्यात गर्भवती असलेल्या वनरक्षक महिलेला माजी सरपंचाने केली लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण.
मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल. pic.twitter.com/5MwtoZKTVg— Bhagwat Hirekar (@BHirekar) January 19, 2022
पैशाची मागणी, धमक्याही दिल्या
ADVERTISEMENT
सिंधू सानप यांनी माध्यमांशी बोलताना माजी सरपंचावर गंभीर आरोप केले आहेत. ‘तीन महिन्यांपूर्वी आपण इथे हजर झाले. त्यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी करण्यात आली. तसेच धमक्या देण्यात आल्या. मी त्यांना जुमानलं नाही. शासकीय कामाचे पैसे मी त्यांना लाटू देत नव्हते. दरम्यान, दोन तीन दिवसांपासून ट्रांझिस्ट लाईनचं काम सुरू होतं. दोन दिवसांपूर्वी त्यांनी धमकी दिली. मात्र, मी माझं काम सुरूच ठेवलं. त्यानंतर ट्रांझिस्ट लाईनच काम संपल्यानंतर परत येत असताना त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर माझ्या पतीलाही चप्पलेनं मारहाण केली’, असं सिंधू सानप यांनी म्हटलं आहे.
‘मागील चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात व्याघ्र गणना कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमासाठी महिला वनरक्षकांनी सोबत सहकाऱ्यांनासोबत घेऊन जाण्याबद्दल शासनाचे आदेश होते. त्यानुसार महिला वनरक्षक सानप या गावातील महिला मजुरांना सोबत घेऊन गेल्या होत्या. त्यावरूनच माजी सरपंच आणि महिला वनरक्षकाचा वाद झाला आणि माजी सरपंचाकडून मारहाण करण्यात आली. त्या तीन महिन्यांच्या गर्भवती आहेत,’ अशी माहिती साहाय्यक वन संरक्षक सुधीर सोनवले यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT