मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण CBI कडे सोपवावं-नारायण राणे
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे CBI कडे सोपवलं जावं अशी मागणी आता भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयित स्कॉर्पिओ कार उभी होती. या कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या. ही कार अँटेलियाच्या बाहेर उभी होती. या कारचे मालक मनसुख हिरेन होते. ही गाडी चोरीला गेली होती अशी मनसुख हिरेन यांनी […]
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हे CBI कडे सोपवलं जावं अशी मागणी आता भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयित स्कॉर्पिओ कार उभी होती. या कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या. ही कार अँटेलियाच्या बाहेर उभी होती. या कारचे मालक मनसुख हिरेन होते. ही गाडी चोरीला गेली होती अशी मनसुख हिरेन यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी सातत्याने देवेंद्र फडणवीस करत होते. मात्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही. आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा प्रश्न या घटनेने पुन्हा निर्माण झाला आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सचिन वाझेंवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत खडाजंगी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडून झाला पाहिजे अशी मागणी नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मी खासदार या नात्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात काही पोलीस सुपारी घेतल्यासारखे वागत आहेत असाही आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसंच गृहमंत्री देत असलेल्या माहितीत कुणाला तरी वाचवलं जातं आहे, या प्रकरणात काहीतरी काळबेरं आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे-अनिल देशमुख
सचिन वाझेंवरून विधानसभेत खडाजंगी
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चर्चा जेव्हा सभागृहात सुरू झाली तेव्हा सचिन वाझेंवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहण्यास मिळाली. सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीवर कारवाई केली म्हणून विरोधकांचा त्यांच्यावर राग आहे का? असा प्रश्न राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला.
ADVERTISEMENT
परिवहन मंत्री अनिल परब यांनीही विरोधी पक्षनेत्यांचा पोलिसांवर विश्वास नाही का? लगेच प्रकरणाचा तपास NIA कडे देण्याची मागणी का होते आहे असा प्रश्न विचारला. तुम्ही पोलिसांवर अविश्वास का दाखवत आहात. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हीच पोलिसांचं किती कौतुक केलं आहे. आता त्यांच्यावर संशय का घेत आहात? असाही प्रश्न परब यांनी विचारला
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT