मराठा आरक्षणाबाबतची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मराठा आरक्षणाबाबतची आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. यापूर्वी 20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअल सुनावणी ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी व्हावी अशी मागणी सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, आजही व्हर्च्युअल सुनावणी होण्याची शक्यता आहे. सकाळी साडे दहाच्या दरम्यान सुनावणीला सुरूवात होईल. त्यामुळे आरक्षणावर असलेली अंतरिम […]
ADVERTISEMENT
मराठा आरक्षणाबाबतची आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. यापूर्वी 20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअल सुनावणी ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी व्हावी अशी मागणी सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, आजही व्हर्च्युअल सुनावणी होण्याची शक्यता आहे. सकाळी साडे दहाच्या दरम्यान सुनावणीला सुरूवात होईल. त्यामुळे आरक्षणावर असलेली अंतरिम स्थगिती उठवली जाईल का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
यापूर्वी 20 जानेवारीला मराठा आरक्षणावरील सुनावणी झाली होती. त्यावेळी याबाबतची सुनावणी प्रत्यक्ष व्हावी अशी मागणी सर्व पक्षकारांनी केली होती. त्यानुसार, न्यायालयाने याबाबतचा निर्णय दोन आठवड्यांनंतर दिले जातील असं स्पष्ट करण्यात आलं होतं. इतर काही युक्तीवाद मागच्या सुनावणीत करण्यात आले नव्हते, त्यामुळे न्यायालयाने मागील सुनावणी स्थगित केली होती.
हे वाचलं का?
याप्रकरणात अंतरिम स्थगिती राज्य सरकारच्या विरोधात आहे, मात्र त्याच्या मेरिटमध्ये न पडता आम्ही ही मागणी करत आहोत, असं रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले होते. राज्य सरकारची बाजू मांडणारे दुसरे वकील कपिल सिब्बल यांनीही न्यायालयात युक्तीवाद करताना आपण मुकूल रोहतगी यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितंल होतं.
हे व्हिडिओ देखील पहा..
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT