“शिवसेना-संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार” : ठाकरेंच्या मागे मराठा सेवा संघाचेही पाठबळ
उस्मानाबाद : गणेश जाधव उस्मानाबाद : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर उद्धव ठाकरे यांना आता मराठा सेवा संघाचेही पाठबळ मिळणार आहे. संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने आज त्यांच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेला पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मराठा सेवा संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांनी […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद : गणेश जाधव
उस्मानाबाद : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर उद्धव ठाकरे यांना आता मराठा सेवा संघाचेही पाठबळ मिळणार आहे. संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने आज त्यांच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेला पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मराठा सेवा संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. अर्जुन तनपुरे म्हणाले, या पुढील काळात मराठा सेवा संघाची जबाबदारी 40 वर्षांच्या आतील व शासकीय सेवेमध्ये उच्च पदस्थ असणाऱ्या मराठा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे. केवळ 30 टक्केच जुने-जाणते पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत असणार आहेत. मराठा सेवा संघाचे राज्यभर एक कोटी सभासद तर 36 वेगवेगळे कक्ष आहेत. या सर्व कक्षांमध्ये फेरबदल करण्यात येणार असून मराठा सेवा संघाचा यापुढे चेहरा तरुण असणार आहे.
एकनाथ खडसेंना घेरण्याची खेळी फसली?, शिंदे-फडणवीस सरकारला न्यायालयाकडून झटका