अभिनेत्री अलका कुबल यांनी बारामतीत जाऊन घेतली शरद पवारांची भेट

मुंबई तक

वसंत मोरे, बारामती मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी आज (8 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. बारामतीतल्या ‘गोविंदबाग’ या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे देखील उपस्थित होते. ही भेट औपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

वसंत मोरे, बारामती

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी आज (8 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. बारामतीतल्या ‘गोविंदबाग’ या पवारांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे देखील उपस्थित होते.

ही भेट औपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री अशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सेटवरील सर्व कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती आणि भेटीचे निमंत्रण दिले होते.

आज कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अलका कुबल यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, पवार साहेबांबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यात प्रमुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागाकडे चित्रिकरण करावे असा आग्रह पवार साहेबांनी व्यक्त केला आहे.