उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते! प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा चर्चेत आणल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. औरंगाबाद येथील सभेत बोलत असताना राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर 4 तारखेपासून मी कोणाचंही ऐकणार नाही असा इशारा देत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावण्याचे आदेश दिले. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरे […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा चर्चेत आणल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. औरंगाबाद येथील सभेत बोलत असताना राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर 4 तारखेपासून मी कोणाचंही ऐकणार नाही असा इशारा देत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावण्याचे आदेश दिले.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांना आपल्या सोशल मीडियावर भोंग्याच्या अल्टीमेटमची आठवण करुन देत उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते असं म्हटलं आहे.
डाव्या डोळ्यावर बट…हिरव्या पैठणीत प्रार्थनाचा मनमोहक अंदाज पाहिलात का?
प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्राजक्ताने अक्षय्य तृतीया आणि ईद च्या शुभेच्छा देताना एक पोस्ट लिहीली होती. ज्यात राज यांच्या औरंगाबाद येथील भाषणाचं कौतुक करत प्राजक्ताने, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. हल्ली अशाप्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खूप धन्यवाद असं लिहीलं. पाहा प्राजक्ताची मुळ पोस्ट…