राज्यभरातल्या 5 हजारांहून अधिक निवासी डॉक्टरांनी उपसलं बेमुदत संपाचं हत्यार! ‘हे’ आहे कारण
Marad Doctors Strike : राज्यभरातला 5 हजारांहून अधिक निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचं हत्यार उगारलं आहे. विविध मागण्या प्रलंबित असल्याने हे सगळे जण संपावर गेले आहेत. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा या सगळ्यांनी दिला आहे. शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याची फक्त आश्वासनं देण्यात आली आहेत. प्रत्यक्षात कृती काहीही […]
ADVERTISEMENT
Marad Doctors Strike : राज्यभरातला 5 हजारांहून अधिक निवासी डॉक्टरांनी बेमुदत संपाचं हत्यार उगारलं आहे. विविध मागण्या प्रलंबित असल्याने हे सगळे जण संपावर गेले आहेत. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा या सगळ्यांनी दिला आहे. शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याची फक्त आश्वासनं देण्यात आली आहेत. प्रत्यक्षात कृती काहीही करण्यात आलेली नाही त्यामुळे निवासी डॉक्टर संतापले आहेत.
ADVERTISEMENT
निवासी डॉक्टरांनी संबंधित विभागाला या मागण्यांविषयीचे स्मरणपत्र सादर केले होते. आपल्या मागण्यांविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती या स्मरणपत्रातून मार्डने राज्य शासनाला केली होती. तसेच याबाबत मार्डच्या राज्यस्तरीय बैठकीत तात्काळ निर्णय न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून बेमुदत राज्यस्तरीय संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय मागण्या लेखी स्वरुपात मान्य होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले आहे. कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेली सेवा आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप फी माफीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांनी 1 ऑक्टोबर पर्यंत मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचे स्पष्ट केले.
‘अशा व्यक्तीकडून पैसे घेणं हेच माझ्या मनाला पटत नाही’, एक असा डॉक्टर ज्याचा तुम्हालाही वाटेल अभिमान
हे वाचलं का?
काय आहेत निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या?
कोव्हिड भत्ता मिळाला पाहिजे
ADVERTISEMENT
शैक्षणिक शुल्क माफ केले गेले पाहिजे
ADVERTISEMENT
राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असलेल्या वसतिगृहांच्या समस्या दूर करणे
पालिका महाविद्यालयातील डॉक्टरांचा टीडीएस, प्रोत्साहन भत्ता, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची फी माफ केली जावी
या चार प्रमुख मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत. याच मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संपावर आहेत. शासनाने कोणतीच आश्वासन पूर्ती केली नाही केवळ पोकळपणा करत आहे.कोरोना योध्यांचा फक्त दाखवण्यासाठी सन्मान केला जात आहे.गरज सरो वैद्य मरो या शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी आजपासून राज्यस्तरीय काम बंद आंदोलनास सुरुवात केली आहे.
सरकारने जाहीर केल्या प्रमाणे कोव्हिड प्रोत्साहन भत्ता आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे तसेच BMC अंतर्गत येणाऱ्या कॉलेज मधील निवासी डॉक्टरांच्या stipend मधून कपात करण्यात येनारा TDS रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केलीय. प्रशासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात या मागणीसाठी मार्डच्या वतीने आज राज्यभर काम बंद आंदोलनास सुरवात केलीय.या आंदोलनामधे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात काम करणारे MD/MS/Diploma/CPS/DM/MCh चे सर्व डॉक्टर्स सहभागी होत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT