मुंबई: कारमधून 35 लाख रुपये चोरले अन् गुजरातला पळाला, मास्टरमाइंडला अहमदाबादमधून अटक

मुंबई तक

शिवशंकर तिवारी, मुंबई: मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्याच्या गाडीतून 35 लाखांचा ऐवज लुटल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अहमदाबादमधील उंजा गावात महिसाणा रोड येथून त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी अहमदाबादहून मुंबईला दुचाकीने यायचे आणि दरोडा टाकून परत अहमदाबादला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

शिवशंकर तिवारी, मुंबई: मुंबईतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापाऱ्याच्या गाडीतून 35 लाखांचा ऐवज लुटल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अहमदाबादमधील उंजा गावात महिसाणा रोड येथून त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी अहमदाबादहून मुंबईला दुचाकीने यायचे आणि दरोडा टाकून परत अहमदाबादला पळायचे. अटक करण्यात आलेला आरोपी हा मूळचा दिल्लीतील रहिवासी आहे. या घटनेसाठी दिल्लीहून अहमदाबादला पाचारण करण्यात आलेला हा मास्टरमाईंड आहे. टोळीतील अन्य 5 साथीदार फरार आहेत.

पोलीस डीसीपी सोमनाथ घार्गे यांना मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी अहमदाबादहून मुंबईत येण्यापूर्वी रेकी करायचे. त्यानंतर लूटमार करून ते अहमदाबादला पळून जायचे.

काही दिवसांपूर्वी समता नगर येथील दरोड्याच्या घटनेत ही टोळी मुंबईत आली होती. मालाड डायमंड मार्केटमध्ये 2 जण रेकी करत होते. फिर्यादी सुनील गुजर यांनी पैशांनी भरलेली बॅग त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारमध्ये ठेवताच आरोपींनी या कारचा पाठलाग सुरु केला.

हे वाचलं का?

    follow whatsapp