पुण्यात लॉकडाऊन होणार का? महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यात लॉकडाऊन लागणार का? या प्रश्नावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाचं उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात रूग्णसंख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत तर लॉकडाऊनही सुरू करण्यात आला आहे. पुण्यातही रूग्णसंख्या वाढते आहे ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे. अशात पुण्यात लॉकडाऊन पुन्हा सुरू होणार का? या प्रश्नावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

पुण्यात मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करणार आहोत. त्याद्वारे कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात कशी आणता येईल यावरही लक्ष देणार आहोत. लॉकडाऊनचं म्हणाल तर तूर्तास तरी लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. सध्या लॉकडाऊन करण्याएवढी परिस्थिती अजून तरी आलेली नाही. स्वॅब कलेक्शन सेंटर वाढवणं, डॉक्टर्स वाढवणं या सगळ्या उपाय योजना आम्ही करतो आहोत. रूग्ण वाढत आहेत पण महापालिका म्हणून आम्ही योग्य ती खबरदारी घेतो आहे. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत आम्ही संचारबंदी सुरू केली आहे. शाळा, महाविद्यालयंही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाचे रूग्ण कमी करण्यासाठी सगळे उपाय करतो आहोत. तरीही संख्या वाढलीच तर इतरही उपाय जे आहेत ते करण्याची तरतूद आम्ही केली आहे असंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

पाहा मुरलीधर मोहोळ यांनी सविस्तर मुलाखत

पुण्यात अनेक गोष्टी सुरू झाल्या, सांस्कृतिक कार्यक्रम, सगळ्या राजकीय पक्षांचे कार्यक्रमांची वाढती संख्या, जनजीवन सुरळीत झालं होतं, शाळा-महाविद्यालयं सुरू झाली. या सगळ्यामुळे बहुदा कोरोना रुग्णांची संख्या वाढली असावी. मात्र सध्याच्या घडीला आम्ही कोरोनाला प्रतिबंध करणारी नियमावली तयार केली आहे. कोरोनाचे रूग्ण कमी करणं हे आमचं लक्ष्य आहे असंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ

ADVERTISEMENT

गेल्या दहा दिवसात हडपसर, सिंहगड रोड, वारजे, औंध आणि बाणेर या ठिकाणी रूग्ण जास्त प्रमाणात वाढले आहेत. मात्र रूग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणीही आम्ही मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करतो आहोत. रूग्ण वाढत असले तरीही सध्या काळजीचं कारण नाही. पण ही संख्या आणखी वाढू नये म्हणूनही काळजी घेतो आहोत असंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

लस आली आहे त्यामुळे कोरोना कमी झाला आहे किंवा संपला आहे असा नागरिकांचा समज झाला. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांनी हलगर्जीपणा केला. गेल्या वर्षभरात नागरिकांनी शिस्त पाळली त्यामुळे कोरोना संपत आला होता. पण आता तो पुन्हा डोकं वर काढतोय असं दिसतं आहे त्यामुळे पूर्वीची पुनरावृत्ती नको असेल तर पुणेकरांनी सहकार्य करावं आणि नियम पाळावेत असं आवाहनही मोहोळ यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT