PNB Scam: फरार मेहुल चोक्सी सापडला, ‘या’ देशात करण्यात आली अटक
पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीबद्दल (Mehul Choksi) एक मोठी बातमी समोर आली आहे. मेहुल चोक्सी हा डोमिनिकामध्ये सापडला आहे. तेथील पोलिसांनी त्याला अटक केली असून आता अँटिगा पोलिसांच्या वतीनेही डोमिनिका प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोक्सी अँटिगामधून अचानक गायब झाला होता. असे म्हटलं जात आहे […]
ADVERTISEMENT

पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीबद्दल (Mehul Choksi) एक मोठी बातमी समोर आली आहे. मेहुल चोक्सी हा डोमिनिकामध्ये सापडला आहे. तेथील पोलिसांनी त्याला अटक केली असून आता अँटिगा पोलिसांच्या वतीनेही डोमिनिका प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोक्सी अँटिगामधून अचानक गायब झाला होता. असे म्हटलं जात आहे की, आपला बचाव करण्यासाठी तो अँटिगामधून पळून गेला होता. परंतु आता डोमिनिका पोलिसांनी त्याला पकडलं असून लवकरच त्याला अँटिगा पोलिसांच्या स्वाधीन केले जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने सीबीआयला कळविले आहे की, मेहुल चोक्सी डोमिनिका येथे सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितले की, तो अँटिगा आणि बार्बुडा येथून बोटीने डोमिनिकाला आला होता.
दरम्यान, इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन म्हणाले, ‘आम्ही डोमिनिकन सरकारला त्यांच्या देशात अवैध प्रवेश केल्याप्रकरणी चौक्सीला अटक करण्यास सांगितले आहे. जेणेकरुन त्याला थेट भारताकडे सोपवता येईल.’
Nirav Modi ला झटका, लंडन कोर्टाने दिली प्रत्यार्पणाला मंजुरी