Sexually Fit: लग्न ठरलेल्या पुरुषांनी ‘या’ गोष्टीकडे करू नये दुर्लक्ष, नाहीतर…
Sex life Tips: जर तुम्ही लवकरच लग्न करणार असाल तर पुरुषांनी स्वतःला लैंगिकदृष्ट्या फिट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जाणून घ्या त्यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स
ADVERTISEMENT
Sexually Fitness Tips: लग्नानंतर जोडीदारासोबतचे सेक्स लाईफ (Sex Life) चांगले नसेल तर नात्यात दुरावा येण्याची किंवा विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे स्वत:ला लैंगिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे आहे. विशेषत: पुरुषांचे लैंगिक आरोग्य (Sexual Health)अधिक बिघडते कारण ते वाईट जीवनशैली आणि मादक पदार्थांच्या सेवन अधिक करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही लवकरच लग्न करणार असाल आणि तुम्ही चुकीची जीवनशैली जगत असाल, तर येथे दिलेल्या टिप्ससह स्वतःला लैंगिकदृष्ट्या फिट ठेवू शकता. (men should keep themselves sexually fit you will not have to feel embarrassed in front of your partner sex health tips)
ADVERTISEMENT
निरोगी असणं गरजेचं
तुमचे लिंग निरोगी असेल तेव्हाच लैंगिक जीवन चांगले होईल. अशा परिस्थितीत, आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी नियमितपणे तेलाने मालिश करा. कोणत्याही चुकीच्या गोष्टीकडे आकर्षित होऊन उपकरण किंवा औषधं यांचा वापर करू नका. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. तसेच, 1 वर्षापेक्षा जुने म्हणजे कालबाह्य किंवा घाणेरडे अंडरवेअर घालू नका.
हे ही वाचा >> Dating app वर भेटलेल्या तरुणीला घरी आणलं अन् झाला ‘गेम’, रात्रीत काय घडलं?
दारू आणि सिगारेटचे सेवन करू नका
जर तुम्हाला दीर्घकाळ लैंगिकदृष्ट्या निरोगी राहायचे असेल, तर मादक पदार्थांचे सेवन ताबडतोब बंद करा. अल्कोहोल आणि सिगारेटमुळे तुमचा स्टॅमिना तर कमी होतोच पण इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या गंभीर लैंगिक समस्या देखील होतात.
हे वाचलं का?
नियमितपणे व्यायाम करा
नियमित वर्कआउट केल्याने लैंगिक तंदुरुस्तीसह संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला फार हेवी वर्कआऊट करण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. स्टॅमिना वाढवणारे व्यायाम हे खूप फायदेशीर आहेत.
हे ही वाचा >> Health: दिवसभराच्या थकव्याने सेक्स लाईफची मजा होते खराब? स्टॅमिनासाठी खा ‘हे’ पदार्थ
आहाराची पूर्ण काळजी घ्या
जर तुम्ही बाहेरचे अन्न जास्त खात असाल तर ते तात्काळ कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा. जंक फूड आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ लैंगिक आरोग्यास त्रासदायक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
ADVERTISEMENT
टीप: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे, त्यामुळे कोणताही डाएट सुरू करण्याआधी किंवा इतर सल्ल्यांसाठी तज्ज्ञांशी जरूर संपर्क साधा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT