आव्हाडांचं मध्यरात्री ट्विट, म्हाडाची होणारी परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थ्यांमध्ये संताप
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारसमोरची आव्हानं काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांवरुन मोठा वाद रंगला होता. यानंतर आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेवरुनही विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विविध पदांसाठी आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. […]
ADVERTISEMENT

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारसमोरची आव्हानं काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांवरुन मोठा वाद रंगला होता. यानंतर आज होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेवरुनही विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विविध पदांसाठी आज होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.
आव्हाड यांनी विद्यार्थ्यांची माफी मागत आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
म्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021
आज सकाळच्या सत्रात म्हाडाच्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधी सल्लागार या पदासाठी परीक्षा होणार होत्या. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. या परीक्षेसाठी आज सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी ही दलाली पद्धत मोडीत काढण्यासाठी जी पदं भरायची आहेत, त्या परीक्षेची प्राथमिक परीक्षा आणि त्यातून गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांची मुख्य परीक्षा होईल असं जाहीर केलं होतं. यासोबतच आव्हाडांनी दलालांना उमेदवारांचे पैसे परत करा असा इशारा देखील दिला होता. या नाट्यानंतर आज ही परीक्षा होणं अपेक्षित होतं परंतु मध्यरात्री जितेंद्र आव्हाड यांनी काही तांत्रिक कारणास्तव आपण ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचं म्हटलं आहे.