Tejas Thackeray हे ठाकरे कुटुंबाचे Vivian Richards, वाचा कोणत्या नेत्यानं केलं आहे कौतुक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तेजस ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने तेजस ठाकरे यांची तुलना Vivian Richards यांच्यासोबत केली आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भातली एक जाहिरातच दैनिक सामना मध्ये दिली असून तेजस ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

काय आहे जाहिरातीत?

तेजस ठाकरेंची तुलना क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबत करण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्स तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या शुभेच्छा असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी काही संबंध नाही तरीही ही तुलना करण्यात आली आहे. या जाहिरातीत तेजस यांच्यासोबत रिचर्ड्स यांचाही फोटो छापण्यात आला आहे.

हे वाचलं का?

तेजस ठाकरे काय करतात?

ADVERTISEMENT

भाऊ आदित्य ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी तेजस ठाकरेंनी शिवसेनेचा प्रचार केला होता. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वन्य जिवांचा अभ्यास करत असताना खेकड्यांच्या अनेक प्रजातीही तेजस यांनी शोधल्या आहेत. यातल्या एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

मागील वर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचाही शोध लावला होता. कर्नाटकमध्ये असलेल्या सकलेशपूरच्या जंगाल उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातीच्या पाली आढळून आल्या आहेत. तेजस ठाकरे यांच्या इंस्टापेजवरही या पालींचे आणि खेकड्यांचे फोटो आहेत.

कोण आहेत व्हिव्हिएन रिचर्ड्स ?

रिचर्ड्स हे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर आहेत. त्यांना व्हिव किंवा किंग व्हिव या नावानेही ओळखलं जातं. वीसाव्या शतकातील पाच महान खेळाडूंच्या यादीत त्यांचं नाव घेतलं जात. २००२ मध्ये क्रिकेटचं बायबल समजल्या जाणाऱ्या विस्डन या मॅगझिनमध्ये विवियन रिचर्ड्स यांच्या एका इनिंगचा समावेश वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली सर्वश्रेष्ठ इनिंगमध्ये करण्यात आला आहे. रिचर्ड्स हे राईटहँड बॅट्समन होते. बॅटिंग करताना ते आक्रमक खेळत. क्रिकेटच्या इतिहासातले एक महान बॅट्समन म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT